ETV Bharat / state

मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अन् चार नराधमांची शिकार झाली; जालन्याच्या तरुणीवर मुंबईत अत्याचार - चिंताजनक

चेंबूरमधील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठवाड्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणीवर 4 अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चेंबूर येथे आपल्या भावाकडे आलेली ही तरूणी 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. तेव्हा तिला विषारी ड्रग्ज पाजून तिच्यावर 4 नराधमांनी अत्याचार केले.

जालन्याच्या तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार
author img

By

Published : Aug 2, 2019, 10:51 PM IST

Updated : Aug 2, 2019, 11:18 PM IST

मुंबई - मराठवाड्यातील जालन्याची रहिवाशी असलेल्या एका तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेंबूर येथे आपल्या भावाकडे आलेली तरुणी 7 जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली असता, तिच्यावर 4 नराधमांनी अत्याचार केले. यानंतर या तरूणीची तब्येत खालावत गेल्याने तिला मूळ गावी रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा ही बाब उघडकीस आली.

जालन्याच्या तरूणीवर मुंबईच्या चेंबूरमध्ये सामुहिक अत्याचार

या घटनेनंतर ही तरुणी आजारी पडली होती. त्यांनतर तरुणीच्या भावाने तिला गावाकडे बोलावून घेतले. गावी उपचार करू असे ठरवून 17 जुलैला ते तिला मुंबईहून जालन्याला नेण्यात आले.

गावात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला 25 जुलै रोजी औरंगाबादमधील रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली, तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र, कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही.

या तरूणीची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याने तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही. डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हा गुन्हा मुंबईत घडला असल्याने बेगमपुरा पोलिसांनी तो गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास चुनाभट्टी पोलीस करीत आहेत.

Intro:चेंबूर मध्ये 19 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

चेंबूर विभागातील चुंनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठवाड्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणीवर 4 अज्ञातानी सामूहिक बलात्कार केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहेBody:चेंबूर मध्ये 19 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

चेंबूर विभागातील चुंनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठवाड्यातील रहिवाशी असलेल्या एका तरुणीवर 4 अज्ञातानी सामूहिक बलात्कार केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मराठवाड्यातील 19 वर्षीय तरुणी चेंबूर येथे राहत असलेल्या भावाकडे काही दिवसांपूर्वी आली होती.ती चेंबूर परिसरात 7 जुलै रोजी मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडली. नंतर तिच्यावर अज्ञात 4 जणांनी सामूहिक अत्याचार केले. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ती घरी परतली आणि झोपली.

तेव्हापासून ती आजारी पडली होती. तिचे दोन्ही पाय लटलट कापतात, तिला पॅरॉलिसिस झाला असावा, असे सांगून भावाने गावाकडील वडिलांना फोन करून बोलावून घेतले. नंतर गावी उपचार करू असे म्हणून 17 जुलै रोजी ते तिला मुंबईहून गावी जालना येथे घेऊन गेले.

गावात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांनी तिला 25 जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावरील उपचाराची कागदपत्रे तपासली आणि तिची तपासणी केली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत त्यांनी तिच्या आई-वडिलांना सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तरुणीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने तिच्यावर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. मात्र कोणी अत्याचार केले हे तिला सांगता आले नाही.

शिवाय तिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनीही तिच्याकडे अधिक विचारपूस केली नाही. 7 जुलै रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या अत्याचारामुळे घाबरलेल्या पीडितेने या घटनेची वाच्यता केली नव्हती. आजारी पडल्याने तिला नातेवाईकांनी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथील डॉक्टरांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून तिच्या वडिलांनी याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

गुन्हा मुंबईत घडला असल्याने बेगमपुरा पोलिसानी तो गुन्हा झिरो करून आता मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास चुंनाभट्टी पोलिस करीत आहेत.

Byte-- दीपक सुर्वे,प्रभारी पोलीस निरीक्षक चुनाभट्टी

Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.