जालना - सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र मात्र थांबायचे नाव घेईना. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. यापैकी एक शेतकरी तीस वर्षाचा असून इतर सर्व पस्तिशीच्या पुढील आहेत.
जानेवारी महिन्यात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरवून त्यांना दहा लाख रुपयांची मदतही देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी तीन शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर एका शेतकऱ्यांबाबत निर्णय घेणे सुरू आहे.
एकूण 13 प्रकरणांमध्ये शासनाने 12 लाख रुपये मदत केली आहे. जानेवारी महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे. पंजाबराव बन्सीधर कोल्हे (वय 45 वर्षे, रा .गूरूपिंपरी ता. घनसावंगी), सुदाम चंद्रभान चेपटे (वय 45 वर्षे, रा. रामगव्हाण,ता.अंबड) दामोदर केशव तट्टू (वय 65 वर्षे, रा. रोहिलागड, ता. अंबड), विलास श्रीराम तांगडे (वय 36 वर्षे, रा. वडोद तांगडा ता.भोकरदन), भानुदास बाबासाहेब सराटे (वय 40 वर्षे, रा.ब्रह्मवडगाव, ता.परतूर), परमेश्वर गुणाजी काजळे (वय 42 वर्षे, रा. अंबड), तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात (वय 30 वर्षे, रा. कुरण, ता. अंबड), शेषराव माणिक खरात (वय 50 वर्षे,रा. गोंदी, ता. अंबड), बळीराम आबाजी पठाडे (वय 65 वर्षे, रा. माहेर भायगाव, ता. अंबड) फेब्रुवारीमध्ये चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामध्ये लक्ष्मण भिमराव खांडेकर ( वय 38 वर्षे, रा. काजळा, ता. बदनापुर), सुखदेव शामराव काकडे (वय 54 वर्षे,रा.बरंजळा साबळे, ता. भोकरदन), शिवाजी देवराव काकडे (वय 52 वर्षे, रा. मालखेडा ता.भोकरदन), कचरूसिंग दिवानसिंग जारवाल (वय 40 वर्षे, रा .सागरवाडी, ता. बदनापूर) यांचा समावेश आहे.
हेही वाचा - 'कोरोना'ची दहशत : रंगपंचमीसाठी बाजारपेठ सजली, ग्राहकांची मात्र खरेदीकडे पाठ