ETV Bharat / state

धक्कादायक! बाजार समितीने भाडेतत्त्वावर दिलेल्या शीतगृहात बियरच्या बाटल्यासह शेळ्यांचा गोठा

बाजार समिती इतर उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये भलतीकडेच वाटचाल करीत आहे. बाजार समितीने त्यांच्या मालकीचे राजुरेश्वर शीतगृह भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र या शीतगृहात बियरच्या बाटल्या आणि शेळ्यांचा गोठा थाटण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 28, 2019, 12:32 PM IST

पडलेल्या रिकाम्या बाटल्या

जालना - शेतीमालासोबतच इतर उत्पन्न मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये बाजार समिती भलतीकडेच वाटचाल करीत आहे. बाजार समितीने त्यांच्या मालकीचे राजुरेश्वर शीतगृह भाडेतत्त्वावर दिले आहे. या भाडेतत्त्वावर दिलेल्या शीतगृहाच्या परिसरात बिअरच्या बाटल्यांचा ढीग आणि शेळ्यांचे गोठे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पैसा महत्वाचा की सुरक्षा महत्त्वाची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बाजार समितीत उभारलेला गोठा, पडलेल्या बाटल्या आणि माहिती देताना पदाधिकारी

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने 20 जून 2011 ला हळद, मिरची, सुकामेवा, हे शीतगृहात ठेवण्यासाठी राजुरेश्वर शितगृहाचे उद्घाटन केले. प्रारंभी दोन वर्ष हे सुरळीत सुरू होते. मात्र नेहमीप्रमाणेच दोन वर्षानंतर येथील उद्योगांना घरघर लागली. शितगृह बंद पडले. त्यानंतर 2013 मध्ये परभणी येथील चाणक्य वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दीड लाख रुपये प्रति महिन्याने हे भाडेतत्त्वावर देण्यात आले, ते आजपर्यंत सुरू आहे.

भाडेतत्वावर देण्यात आलेल्या शितग्रृहाची सुरक्षा आणि देखभाल मात्र मार्केट कमिटीकडे आहे. परंतु याकडे सुरक्षितपणे दुर्लक्ष होऊन वर्षानुवर्षे या परिसरामध्ये शेळ्या बांधल्या जातात. त्यांच्यासाठी पत्राचे शेडही केले आहे. त्यासोबत येथे हे रिकाम्या बियरच्या बाटल्यांचा ढीग पडलेला आहे. त्यामुळे निश्चितच येथे अनधिकृत धंदे होत असल्याचा पुरावाच मिळत आहे. शीतगृहांच्या आतमध्ये कोल्ड्रिंक्सचे कॅरेट आणि स्टॉलचे सामान सापडले आहे. शीतगृहातील सामानाचा जरी धोका नसला, तरी बाहेरच्या बियरच्या बाटल्यांचा ढीग मात्र या परिसरातील सुरक्षिततेचे धिंडवडे काढणारे आहेत.

Intro:शेतीमाला सोबतच इतर उत्पन्न नाही मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये बाजार समिती भलतीकडेच वाटचाल करीत आहे. बाजार समितीने त्यांच्या मालकीचे असलेले राजुरेश्वर शीतगृह भाडेतत्त्वावर दिले आहे .या भाडेतत्त्वावर दिलेल्या शीतगृहा च्या परिसरात बिअरच्या बाटल्यांचा ढीग आणि शेळ्याची गोठे बांधण्यात आले आहेत .त्यामुळे पैसा महत्वाचा की सुरक्षा महत्त्वाची हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Body:जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने 20 जून 2011 ला हळद, मिरची ,सुकामेवा,हे शीतगृहात ठेवण्यासाठी राजुरेश्वर शितगृहाचे उद्घाटन केले .प्रारंभी दोन वर्ष हे सुरळीत सुरू होते. मात्र नेहमीप्रमाणेच दोन वर्षानंतर येथील उद्योगांना घरघर लागली. आणि शितग्रह बंद पडले. त्यानंतर 2013 मध्ये परभणी येथील चाणक्य वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दीड लाख रुपये प्रति महिन्याने हे भाडेतत्त्वावर देण्यात आले, ते आज पर्यंत सुरू आहे
भाडेतत्वावर देण्यात आलेले हे शितग्रह याची सुरक्षा आणि देखभाल ही मात्र मार्केट कमिटीचे काम आहे .परंतु याकडे सुरक्षितपणे दुर्लक्ष होऊन गेल्या वर्षानुवर्षे इथे परिसरामध्ये शेळ्या बांधल्या जातात. त्यांच्यासाठी पत्राचे शेडही केले आहे त्याच सोबत इथे हे रिकाम्या बिअरच्या बाटल्यांचा ढीग पडलेला आहे. त्यामुळे निश्चितच इथे अनधिकृत धंदे होत असल्याचा पुरावाच मिळत आहे. शीतगृहांच्या आत मध्ये कोल्ड्रिंक्सचे कॅरेट आणि स्टॉल चे सामान सापडले आहे शीतगृहातील सामानाचा जरी धोका नसला तरी बाहेरच्या बिअरच्या बाटल्यांचा ढीग मात्र या परिसरातील सुरक्षिततेचे धिंडवडे काढणारे आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.