ETV Bharat / state

आमदार कुचे यांची वाट खडतर, माजी आमदार सांबरे यांनी फिरविली पाठ

author img

By

Published : Oct 9, 2019, 3:25 PM IST

बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त बंडखोरी आहे. या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांची वाट खडतर होत आहे. त्यातच या मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनीदेखील आज कुचे यांच्या प्रचारकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून मनसेच्या तिकिटावर उभे असलेले राजेंद्र भोसले यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे.

आमदार कुचे यांची वाट खडतर

जालना- जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांपैकी बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त बंडखोरी आहे. या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांची वाट खडतर होत आहे. त्यातच या मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनीदेखील आज कुचे यांच्या प्रचारकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून मनसेच्या तिकिटावर उभे असलेले राजेंद्र भोसले यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे.

माजी आमदार संतोष साबरे यांचा संग्रहीत बाईट

बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा मागील पाच विधानसभेपासून शिवसेनेकडे होता. आणि या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडूनही यायचे. मात्र मागील वेळेस भाजप-सेनेची युती तुटली आणि भाजपने औरंगाबाद येथून आयात केलेले नारायण कुचे हे आमदार झाले. यावेळी हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला सोडावा अशी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यासंदर्भात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी बैठकही झाली होती. त्यावेळी संतोष सांबरे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी आग्रही मागणी केली होती. तसे न झाल्यास उद्धव ठाकरे देतील तो आदेश आपण पाळू असे त्यांनी सांगितले होते.

मात्र सध्या संतोष सांबरे यांनी युतीच्या प्रचाराकडे पाठ फिरविली आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे सांबरे हे खोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उपस्थित नव्हते. त्याचबरोबर बदनापूर येथे आमदार नारायण कुचे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही ते नव्हते. त्यानंतर झालेल्या बदनापूर शहरातील सभेकडे देखील माजी आमदार सांबरे यांनी पाठ फिरवली. इकडे शिवसेनेकडे पाठ फिरवलेली असतानाच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ३ ऑक्टोबर रोजी परतूर येथे दाखल केलेल्या उमेदवारीच्या वेळी मात्र सांबरे यांनी हजेरी लावली. यावरून सांबरे यांनी शिवसेनेच्या कामाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सांबरे यांच्या नाराजीसह राजू आहिरे यांनी केलेली बंडखोरी ही देखील कुचे यांच्या अडचणीची बाब होती. मात्र या बंडखोर उमेदवाराला थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. मागील तीन विधानसभेपासून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले अंबडचे शिवसेनेचे राजेंद्र भोसले यांनी बंडखोरी करून मनसेमध्ये प्रवेश मिळविला. आणि रेल्वेचे इंजिन रुळावर आणण्यासाठी त्यांनी आमदार कुचे यांना शह देण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी आणि अन्य एक राजेंद्र मगरे हे दोघेही नारायण कुचे यांना अडचणीत आणू शकतात.

हेही वाचा- एकनाथ खडसे म्हणतात... २४ ऑक्टोबरला सरकार महाआघाडीचेच येणार!

एकंदरीत बाहेरून आयात केलेले उमेदवार म्हणून बदनापूर मतदार संघात नारायण कुचे आणि बबलू चौधरी या दोघांनाही जनता आयात केलेले उमेदवार म्हणून पाहत आहे. अंबड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी आमदार नारायण कुचे यांची भावजय तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे विधानपरिषदेचे पराभूत उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांचे चिरंजीव आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत बाबुराव कुलकर्णी यांचा दारुण पराभव झाला. त्यावेळी नारायण कुचे यांनी त्यांना मदत केली नव्हती. त्यामुळे कुलकर्णी देखील कुचे यांना अडचणीत आणण्यासाठी कार्यरत आहेत.

हेही वाचा- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आता बर्तन बँक

Intro:जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त बंडखोरी आहे. या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांची वाट खडतर होत आहे .त्यातच या मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनीदेखील आज कुचे यांच्या प्रचार कडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून मनसेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या राजेंद्र भोसले यांच्याशी त्यांना सामना करावा लागणार आहे.

Body:बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा मागील पाच विधानसभे पासून शिवसेनेकडे होता. आणि शिवसेनेचे आमदार निवडूनही यायचे .मात्र मागील वेळेस भाजप-सेनेची युती तुटली आणि भाजपाने औरंगाबाद येथून आयात केलेले नारायण कुचे हे आमदार झाले .यावेळी हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला सोडावा अशी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी होती .त्यासंदर्भात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी बैठकही झाली होती. त्यावेळी संतोष सांबरे यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी आग्रही मागणी केली होती. तसे न झाल्यास उद्धव ठाकरे देतील तो आदेश आपण पाळू असे त्यांनी सांगितले होते .मात्र सध्या संतोष सांबरे यांनी युतीचा प्रचाराकडे पाठ फिरविली आहे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे सांबरे हे खोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उपस्थित नव्हते, त्याच सोबत बदनापूर येथे हे आमदार नारायण कुचे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ही ते नव्हते ,त्यानंतर झालेल्या बदनापूर शहरातील सभेकडे देखील माजी आमदार सांबरे यांनी पाठ फिरवली. इकडे शिवसेनेकडे पाठ फिरवलेली असतानाच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी 3 ऑक्टोबर रोजी परतूर येथेदाखल केलेल्या उमेदवारी च्या वेळी मात्र सांबरे यांनी परतूर येथे हजेरी लावली. यावरून सांबरे यांनी शिवसेनेच्या कामाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत .
सांबरे यांच्या नाराजीसह राजू आहिरे यांनी केलेली बंडखोरी ही देखील एक कुचे यांच्या अडचणीची बाब होती. मात्र ह्या बंडखोर उमेदवाराला थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. मागील तीन विधानसभा पासून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले अंबड चे शिवसेनेचे राजेंद्र भोसले यांनी बंडखोरी करून मनसे मध्ये प्रवेश मिळविला आणि आणि रेल्वेचे इंजिन रुळावर आणण्यासाठी त्यांनी आमदार कुचे यांना शह देण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी आणि अन्यएक राजेंद्र मगरे हे दोघेही जण नारायण कुचे यांना अडचणीत आणू शकतात.
एकंदरीत बाहेरून आयात केलेले उमेदवार म्हणून बदनापूर मतदार संघात नारायण कुचे आणि बबलू चौधरी या दोघांनाही ही जनता आयात केलेले उमेदवार म्हणून पाहत आहे . अंबड नगरपालिकेच्या अध्यक्षपदी आमदार नारायण कुचे यांची भावजय तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे विधानपरिषदेचे पराभूत उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांचे चिरंजीव आहे महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत बाबुराव कुलकर्णी यांचा दारुण पराभव झाला त्यामुळे तेदेखील नारायण कुचे यांनी मदत केली नसल्यामुळे कुठे यांना अडचणीत आणण्यासाठी कार्यरत आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.