जालना - मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी आघाडी सरकारच जबाबदार आहे. ते रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेले निवेदन हे हास्यास्पद आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जालन्यात केली. रद्द झालेले मराठा आरक्षण आणि त्याबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका, यासंदर्भात शनिवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. यावेळी पाटील यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती.
त्या शिफारशी आज का अमान्य-
ज्या शिफारशी युतीच्या काळात ठाकरे सरकारला मान्य होत्या, त्या शिफारशी यावेळी त्यांनी अमान्य कशा केल्या? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. युतीच्या काळात देखील भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाच्या बाजूने होती आणि आता देखील मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी समाजास सोबतच आहे, असे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.