ETV Bharat / state

जालन्यात गरजुंच्या तोंडचा घास रस्त्यावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीत गरिबांना विविध योजनेतून अन्नदान करण्यात येत आहे. जालन्यात अनेक ठिकाणी अन्नाची पाकिटे रस्त्यावर आढळल्याने विविध तर्कवितर्क करण्यात येत आहे.

रस्त्यावर सापडलेले अन्नाची पाकिटे
रस्त्यावर सापडलेले अन्नाची पाकिटे
author img

By

Published : Apr 14, 2020, 4:11 PM IST

जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. याचा मोठा फटका कष्टकरी, रोजंदारी मजूर, गोरगरिबांना बसत आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था विविध संस्था, विविध लोकांकडून करण्यात येत आहे. येथील प्रशानाकडून सुरुवातीला 10 हजार तयार अन्नाची पाकिटे वाटली गेली. त्यानंतर हळूहळू या वाटपातील गोंधळ समोर येत गेला. आज अन्नपाकिटांची संख्या केवळ २ हजार इतकी आहे. ही संख्या कमी होण्यासाठी याची वाटप प्रणालीही जबाबदार आहे. कारण, जालनाच्या अग्रसेन चौकामध्ये जेवणाची पाकिटे रस्त्यावर पडल्याचे दिसून आहे.

जालन्यात गरजुंच्या तोंडचा घास रस्त्यावर

गरज नसतानाही ही नको त्या व्यक्तींच्या हाती हे अन्नाची पाकिटे दिल्यामुळे तसेच गरजवंतांना सोडून हितसंबंध जोपासले जात आहेत . प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत आणि यातूनच अन्नाची नासाडी समोर येत आहे. सोमवारी (दि. 13 एप्रिल) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोकरदन नाका येथे असलेल्या महाराजा अग्रसेन चौकामध्ये तयार अन्नांची पाकीटे रस्त्यावर विखुरली गेली होती. अशीच पाकिटे पुढे भोकरदन नाक्याकडील राजुर कॉर्नरपर्यंत विविध ठिकाणी पडली होती. त्यामुळे ही पाकिटे पडली, पाडली की ज्यांना दिली त्यांनी टाकून दिली, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. कारण, काहीही असो मात्र अन्नाची नासाडी होताना दिसत आहे.

शहरात विविध भागात असलेल्या भिक्षेकरुंकडे देखील अन्नाची दोन-दोन पाकिटे दिसायला लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता अन्नाच्या नासाडी कडेही लक्ष देण्याची गरज आहे. कारण, आता येत्या 3 मेपर्यंत हे अन्न वाटप सुरु ठेवावे लागणार आहे.

हेही वाचा - बदनापूरमध्ये गरजुंना अन्नधान्य किटचे वाटप... शेतातील गहूही दिला गरीबांना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.