जालना - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गणपती नागरी सहकारी पतसंस्था, राजाभाऊ देशमुख मिञ मंडळ, गणपती परिवार भोकरदन यांच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा- Coronavirus : इंदोरमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांचा आकडा 44 वर
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, उद्योजक महादुशेठ राजपुत, हुकुमशेठ चुंडावंत, मोहनशेठ हिवरकर, डॉ. अमित कुमार सोंडगे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सुरेश तळेकर, नगरसेवक संतोष अन्नदाते यांची उपस्थिती होती.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज सातवा दिवस आहे.