ETV Bharat / state

आगीत ऊस जळून खाक, 8 लाखांचे नुकसान

author img

By

Published : Jan 26, 2021, 8:41 PM IST

तोडणीला आलेल्या उसाला आग लागल्याची घटना अंबड तालुक्यतील सैंदलगाव परिसरामध्ये घडली आहे. या आगीमध्ये 4 एकर ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे तब्बल 8 लाखांचे नुकसान झाले आहे.

आगीत ऊस जळून खाक
आगीत ऊस जळून खाक

जालना - तोडणीला आलेल्या उसाला आग लागल्याची घटना अंबड तालुक्यतील सैंदलगाव परिसरामध्ये घडली आहे. या आगीमध्ये 4 एकर ऊस जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे तब्बल 8 लाखांचे नुकसान झाले आहे.

आगीत ऊस जळून खाक, 8 लाखांचे नुकसान

चार एकर ऊस आगीत जळून खाक

अंबड तालुक्यातील वडीगोदरी येथील शेतकरी विजय आप्पासाहेब काळे यांचा सौंदलगाव परिसरातील गट नंं 58 मध्ये 4 एकर ऊस होता. हा ऊस काढणीसाठी आला होता, मात्र या उसाला अचानक लागलेल्या आगीमुळे ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत विजय काळे यांचे 8 लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान आगीची घटना कळताच समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाचा 1 बंब घटनास्थळी दाखल झाला, मात्र एका बंबाने ही आग आटोक्यात आली नाही, व अवघ्या 2 तासांमध्ये ऊस जळून खाक झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.