जालना - घनसावंगी तालुक्यातील शेवता फाट्यावर हायवा या वाहनाने पेट घेतला. यामध्ये हायवा जळून खाक झाल्याने 40 लाखांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाने प्रंसगावधान साधून आपला बचाव केला.
पाथरवाला खुर्द येथील प्रणित हर्षे यांच्या मालकीचा हायवा ट्रक तिर्थपुरी-भोगाव या रस्त्यावर शेतीसाठी मळी घेऊन जात होता. दुपारी दीड वाजता हायवाच्या कॅबिनने अचानक पेट घेतला. हा पेट इतका भयानक होता की, हायवाचा फक्त लोखंडी पत्रा शिल्लक राहिला आहे. ज्यामध्ये अंदाजे 40 लाखापर्यंत नुकसान झाले आहे.
या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असेलेले झाडे-झुडपे होरपळून गेली. गोंदी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन हायवा विझविण्यासाठी प्रयत्न केले. पंरतू रखरखत्या उन्हात हायवा जळून खाक झाला होता. यावेळी या हायवाचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आला.