जालना - बदनापूर येथे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून संघर्ष फाउंडेशनच्या वतीने रविवारी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संघर्ष फाउंडेशनच्या वतीने भाजी मंडईत भाजीपाला विक्रेत्या महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राजुरेश्वर हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर मयुरी सचिन उकिरडे यांनी सामान्य महिलांची रुग्णसेवा करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, नगरपंचायतीच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. सोबतच महिला वकील अॅड. मनीषा बाबूलाल मंत्री व नोकरी करून चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या निशा रामप्रताप मंत्री यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बदनापूर नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा चित्रलेखताई पांडुरंग जऱ्हाड यांचा देखील सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेख आफ्रिन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बदनापूर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी कल्याणी भागवत यांचा सत्कार करण्यात आला. वरुडी येथील वस्तीशाळेच्या उपक्रमशील शिक्षिका निर्मला कागदे व आपल्या अपंगत्वावर मात करून व्यवसायिक क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या अनिता भरत शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघर्ष फाउंडेशनचे प्रदिप उगलमुगले, ज्ञानेश्वर पवार, गणेश जगताप, राहुल जऱ्हाड, आनंद इंदानी, किशोर सिरसाठ, भरत शेळके, अर्जुन वेताळ, कृष्णा सातपुते, अमोल म्हस्के, कृष्णा कातुरे, संतोष वरकड, भगवान गवारे, गणेश जगताप, कैलास दाभाडे, गणेश दाभाडे, राजेंद्र जऱ्हाड आदींची उपस्थिती होती.