ETV Bharat / state

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे - अधिक्षक कृषि अधिकारी

आज भोकरदन, बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात 5 तास ठिय्या आंदोलन केले.

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:42 PM IST

जालना - जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंतही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी यासाठी वारंवार शासन दरबारी चकरा मारल्या, आंदोलने केली. मात्र, त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी रास्ता रोकोही केले. त्यावेळीही शेतकऱ्यांना लेखी आश्वासनावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आज भोकरदन, बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात 5 तास ठिय्या आंदोलन केले.

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

पिक विमा देण्याच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे बदनापूर, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा विमा त्वरित खात्यावर जमा करावा, त्याशिवाय कार्यालयाच्या बाहेर पडणार नाही, अशी भूमीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, पिक विमा देणे हे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या हातात नसल्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. लवकरच हा विमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, त्यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.

दरम्यान प्रकरण वाढल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्याबरोबरच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे देखील या कार्यालयात तळ ठोकून होते.

शेवटी कृषी अधीक्षक शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांनी मोबाईलवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर विमा कंपनीने लेखी आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले .

आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज शेवाळे, गजानन पाटील बंगाळे, युती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, युती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष अश्विनी सानप, अशोक बापू मुटकुळे, निवृत्ती सानप, वाल्मीक शेवाळे, गणेश बावणे, बाबासाहेब जोशी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचीची उपस्थिती होती.

Intro:जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंत ही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार शासन दरबारी चकरा मारल्या आंदोलने केली मात्र त्यांच्या पदरी अश्‍वासनाशिवाय काहीच पडले नाही .त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी रास्ता रोको ही केले, त्यावेळी लेखी आश्वासनावर त्यांना समाधान मानावे लागले मात्र अद्यापपर्यंत ही शेतकऱ्यांना पिक विमा न मिळाल्यामुळे विशेषता भोकरदन,बदनापूर तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांनी आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन केल.

Body:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिनांक 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन आज दिनांक 17 रोजी आंदोलन करण्याविषयी कळविले होते. मात्र शासनाने याची दखल घेतली नाही त्यापूर्वी दिनांक 21 जून रोजी बावणे पांगरी पाटीवर रास्ता रोको ही करण्यात आला होता. जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे रस्ता रोको मागे घेतला होता .परंतु महिना होत आला तरीही या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे बदनापूर, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठले आणि ठिय्या आंदोलन केले .जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्यांचा विमा त्वरित खात्यावर जमा करावा त्याशिवाय कार्यालयाच्या बाहेर पडणार नाहीत असा निश्चय शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र पिक विमा देणे हे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या हातात नसल्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांसोबत चर्चा केली. आणि लवकरच हा विमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले .मात्र त्यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही आणि हळूहळू प्रकरण तापू लागले .या तापत्या प्रकरणा सोबतच पोलिसांचा फौजफाटा ही वाढू लागला. आणि प्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन थांबले. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनीदेखील या कार्यालयात तळ ठोकला.
शेवटी कृषी अधिक्षक श्री शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांनी मोबाईल वरून ंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि प्रकरणाची तीव्रता लक्षात आणून देऊन या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आणि आणि लेखी आश्वासन घेतले ,विमा कंपनीने लेखी आश्वासन दिल्यानुसार उर्वरित शेतकऱ्यांचा पिक विमा सोमवार पर्यंत संबंधिताच्या खात्यावर जमा होईल ,असे आश्वासन दिले. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले .
आजच्या या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज शेवाळे, गजानन पाटील बंगाळे ,युती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, युती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष अश्विनी सानप ,अशोक बापू मुटकुळे, निवृत्ती सानप, वाल्मीक शेवाळे, गणेश बावणे, बाबासाहेब जोशी ,यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची ची उपस्थिती होती.

******यापूर्वी देखील या बातमीचे विजवल मोजोवरून mh_jal नावाने पाठवलेले आहेत.*********

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.