जालना - खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जाफ्राबाद शहरातील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या आवारात ही घटना घडली आहे. सिताराम देवडे (वय वर्ष 65) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आत्महत्या मागचे कारण अद्याप अस्पष्ट -
सिताराम हे जाफ्राबाद तालुक्यातील वरुड गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सिताराम देवडे यांनी आज(7 सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास खरेदी विक्री संघाच्या कार्यालय आवारातील पाठीमागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - बेळगावात एकीकरण समितीतीत फाटाफूट करून भाजपा सत्तेत - संजय राऊत