ETV Bharat / state

वाहनाचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित वाहनाची तपासणी करणे आवश्यक असते, त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र तसे न करता प्रत्यक्षात वाहन न तपासताच, केवळ त्याचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्याविरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
वाहनाचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Feb 27, 2021, 6:56 PM IST

जालना - पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित वाहनाची तपासणी करणे आवश्यक असते, त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र तसे न करता प्रत्यक्षात वाहन न तपासताच, केवळ त्याचा फोटो पाहून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्याविरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना औद्योगिक वसाहत परिसरामध्ये असलेल्या नॅशनल पीयूसी सेंटरमध्ये बनावट पीयूसी प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार उदय साळुंखे यांनी दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी अविनाश शंकरराव पवार, रा. अहिल्यादेवी नगर, चिकलठाणा, औरंगाबाद यांच्या वाहन क्रमांक एम एच 20 DA 5084 च्या पीयूसी प्रमाणपत्राची तपासणी केली. हे पीयूसी प्रमाणपत्र याच सेंटरमधून मिळाले होते, मात्र पीयूसी प्रमाणपत्र देताना वाहन तेथे प्रत्यक्षात हजर नसल्याचे आढळून आले. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये भिकन भागचंद सोमासे, राहणार लोणी, तालुका वैजापुर यांचे वाहन एम एच 20 DU 0148 हे वाहन दिनांक 29 मे 2018 रोजी साई ऑटो इथे एक्सचेंज करण्यासाठी जमा केले होते. त्यानंतर ते कोणाला विक्रि करण्यात आले, याबाबत कुठलीच नोंद नाही, मात्र तरी देखील या वाहनाला पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.

पीयूसी सेंटरच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान याप्रकरणी पीयूसी सेंटरचा मालक शेख साजिद शेख कबीर रा. संजयनगर याच्याविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.