जालना - ठेवीदारांचे पैसे वेळेत परत न केल्यामुळे भारतीय रिझर्व बँकेने मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मंठाच्या जालना शाखेवर नोव्हेंबर 2020 मध्ये निर्बंध आणले होते. या निर्बंधांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे.

हेही वाचा - जालना शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी; जागेवरच दंड
मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मंठा या बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 1949 अन्वये 13 नोव्हेंबर 2020 च्या पत्रानुसार दिनांक 16 नोव्हेंबर २०२० पासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केले होते. आता परत एकदा रिझर्व बँक ऑफ इंडियाने 14 मे 2019 च्या आदेशानुसार दिनांक 17 मे पासून 16 आगस्ट 2021 पर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी या निर्बंधांना मुदतवाढ दिलेली आहे. यासंदर्भातील नोटीस मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक एस.बी. भालेराव यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावर चिटकवली आहे. बँकेच्या वर लावलेली पाटी देखील गायब झाली आहे.
हेही वाचा - जालना; कोरोनाचे संकट, तरीही शेतकरी करतोय नव्या उमेदीने शेतीची मशागत