परतूर (जालना) : येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन बळकावल्या प्रकरणी चाळीस जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ( Waqu Board Land Encroachment In Partur ) करण्यात आला आहे. जिल्हा वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत परतूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे ( Jalna Partur Waqu Board Register Case ).
परतूर शहरातील परिसात गट क्रमांक 304 आणि 301 मध्ये वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी आहेत. गेल्या काही वर्षांसून येथे अतिक्रमण करत पक्की घरे बांधून ही जमीन बळकवण्यात आली होती. याप्रकरणी वक्फ बोर्डाने चाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहे.
दोन महिलांची प्रकृती खालावली
दरम्यान, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी विभागीय कार्यालयासामोर आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, जो पर्यंत जमीन बळकवणाऱ्या माफिया विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांचं मत आहे.
हेही वाचा - Aurangabad PickUp Tractor Accident : पिकअप गाडीची उभ्या ट्रॅक्टरला धडक, पाच जणांचा मृत्यू