जालना - शहरात अतिक्रमणांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पाहता शहरालगत असलेल्या नवीन वसतीमधील आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात आज भोकरदन रस्त्यावरील ढवळेश्वर मंदिरापासून भोकरदन नाका मार्गे राजूरी कॉर्नर पर्यंत काही अतिक्रमणे काढण्यात आली.
हेही वाचा- 'नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जींच्या सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी विचारात घ्याव्यात'
यामध्ये रस्त्यावर असलेल्या पानाच्या दुकानांचा जास्त समावेश आहे. नगरपालिकेचे पाच ट्रॅक्टर आणि शंभर कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटवली. आठवड्यातून एकावेळेस ही अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचेही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.