ETV Bharat / state

कोरोनामुळे जालन्यातील 'या' पुरातन दुर्गा मंदिरातील यात्रा रद्द - Police Training Center Durga Temple Jalna

परिसरातच ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे, यात्रा महोत्सवादरम्यान या प्रार्थना स्थळांच्या जागा किरायाने देऊन चर्चला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. मात्र, यावर्षी यात्रा महोत्सव रद्द झाल्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि या प्रार्थना स्थळांचेही उत्पन्न बुडाले आहे.

दुर्गा माता
दुर्गा माता
author img

By

Published : Oct 15, 2020, 10:19 PM IST

जालना - शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. नवरात्री काळात येथे यात्रा भरते. मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि प्रार्थना स्थळांचे उत्पन्न बुडाले आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी व रमेश महाराज

भाविक वर्षभर या यात्रेची आतुरतेने वाट पाहतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली आहे. हे पुरातन मंदिर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर आहे. सरकारी जागेवर हे मंदिर असल्याने या मंदिराचा विकास झालेला नाही. मात्र, नवरात्र महोत्सवापूर्वी या मंदिराची पारंपारिक पद्धतीने रंगरंगोटी आणि दुरुस्ती केली जाते.

यात्रा भरवण्यासाठी या जागेची जाहीर निविदा निघते. यातील महसूल पोलीस प्रशासनाला मिळतो. मंदिरातील दुर्गा देवीची सर्वत्र ख्याती आहे. देवीला विविध रुपांमध्ये पाहिले जाते. त्यासाठी देवीला नटवणे, सजवणे, तिचा श्रुंगार करणे ही सर्व कामे गेल्या ६० वर्षापासून रमेश महाराज करीत आहेत. विशेष म्हणजे, देवीचा तांदळा हा स्वयंभू असून कुंकूमध्ये स्थापित झालेला आहे. त्यामुळे, कलाकुसरीने या तांदळाचा श्रुंगार करावा लागतो. त्यासाठी सुमारे तीन तास वेळ लागत असल्याची माहिती रमेश महाराज यांनी दिली.

दरम्यान, या परिसरातच ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे, यात्रा महोत्सवादरम्यान या प्रार्थना स्थळांच्या जागा किरायाने देऊन चर्चला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते. मात्र, यावर्षी यात्रा महोत्सव होत नसल्यामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि या प्रार्थना स्थळांचेही उत्पन्न बुडाले आहे.

हेही वाचा- मोती तलाव बुजवून पार्किंग, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष; लाखो रुपयांचे उत्पन्न कोणाच्या घशात?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.