ETV Bharat / state

जालन्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर

बदनापूर तालुक्यातील परतीच्या पावसाने पिकाची अतोनात हानी झालेली असून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यानंतर तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी विविध गावातील शेतीला भेटी देऊन पाहणी केली.

जालन्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर
author img

By

Published : Nov 2, 2019, 7:39 PM IST

जालना - बदनापूर तालुक्यातील परतीच्या पावसाने पिकाची अतोनात हानी झालेली असून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यानंतर तहसीलदार व कृषी अधिकारी यांनी विविध गावातील शेतीला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शेतीत पाणी साचलेले असल्यामुळे व वस्तुनिष्ठ परिस्थिती दिसावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करून नुकसानीची पाहणी करण्यात आली.

हेही वाचा - शरद पवार सोनिया गांधींना भेटणार; सोमवारी राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता

बदनापूर तालुक्यात यंदा मान्सूनचा अत्यल्प पाऊस पडला होता. त्यानंतर पडलेल्या थोड्याफार पावसावर कशीबशी खरीप पिके आली होती. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिके सोंगणी (कापणी) करुन काढणीस शेतात ठेवली होती. असे असतानाच पावसामुळे सर्व पिके वाहून गेली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळेसच शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज शनिवारी बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी तालुकयातील खामगाव, दाभाडी, चिखली व चणेगाव या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

यावेळी साचलेल्या पाण्यातून अंतर कापून अधिकाऱ्‍यांनी पाहणी केली. तसेच तालुक्यात सर्वत्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या वतीने पंचनामे करणे सुरू असून त्या अहवालानंतर तात्काळ नुकसान भरपाईची तरतूद करण्यात येणार आहे. तथापी, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पुढील भागात जाणे शक्य नव्हते. त्यामुळे थेट ड्रोन कॅमेरा मागवून त्यात पाण्याच्या पुढील भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

कृषी अधिकारी व्यकंट ठक्के यांनी सांगितले की तालुक्यात सर्वत्र पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत सर्वांना सरसकट दुष्काळी अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. त्यांनी सातबारा, आधार कार्ड व पीक विमा भरणा केलेली पावती व अर्ज विमा कंपनीच्या बदनापूरच्या कार्यालयात किंवा ग्राम सेवक, कृषी सहाय्यकाकडे करावे जेणे करुन त्वरित पीक विमाही मंजूर करण्यात येईल असे सांगितले.

हेही वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Intro:बदनापूर, दि. 18 (सा.वा.): तालुक्यातील परतीच्या पावसाने अतोनात हानी झालेली असून त्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिल्यानंतर तालुक्यात तहसीलदार छाया पवार व कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी तालुक्यातील विविध गावांतील शेतीला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शेतीत पाणी साचलेले असल्यामुळे व वस्तुनिष्ठ परिस्थिती दिसावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग करून नुकसानीची पाहणी करण्यात आली.

बदनापूर तालुक्यात यंदा मान्सूनचा अत्यल्प पाऊस पडला होता. त्यानंतर पडलेल्या थोडयाफार पावसावर कशीबशी खरीप पिके आली होती. मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी पिके सोंगणी करून काढणीस शेतीत ठेवलेली असतानाच ऐन परतीच्या पावसामुळी सर्व पिके वाहून गेली, त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळेसच शेतकरी हवालदिल झाला. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज शनिवार रोजी बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी तालुकयातील खामगाव, दाभाडी, चिखली व चणेगाव या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. या वेळी साचलेल्या पाण्यातून अंतर कापून अधिकाऱ्‍यांनी पाहणी केली. तसेच तालुक्यात सर्वत्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या वतीने पंचनामे करणे सुरू असून त्या अहवालानंतर तात्काळ नुकसान भरपाईची तरतूद करण्यात येणार आहे. तथापि, काही ठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पुढील भागात जाणे शक्य नसल्यामुळे थेट ड्रोन कॅमेरा मागवून त्यात पाण्याच्या पुढील भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. या बाबत बोलताना कृषी अधिकारी व्यकंट ठक्के यांनी सांगितले की तालुक्यात सर्वत्र पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून या बाबत सर्वांना सरसकट दुष्काळी अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्यांनी सातबारा, आधार कार्ड व पिक विमा भरणा केलेली पावती व अर्ज विमा कंपनीच्या बदनापूरच्या कार्यालयात किंवा ग्राम सेवक, कृषी सहाय्यकाकडे करावे जेणे करून त्वरित पिक विमाही मंजूर करण्यात येईल, असे सांगितले.Body:पाहणी करताना तहसीलदार छाया पवार, कृषी अधिकारी व्यंकट ठक्के

व्हिडीओ प्रतिक्रिया: बदनापूर तालुका कृषी अधिकारी ठक्केConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.