ETV Bharat / state

उद्योजकांनी व्यवसायामध्ये नावीन्य ठेवावे - डॉ. स्मिता लेले - जालना जिल्हा बातमी

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्री समारंभाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता लेले बोलत होत्या.

Dr. Smita Lele
डॉ. स्मिता लेले
author img

By

Published : Jan 12, 2020, 12:30 PM IST

जालना - एकदा उद्योजकांनी उद्योगांमध्ये पडल्यानंतर उद्योजकांचा धर्म स्वीकारला पाहिजे. त्यामध्ये नामोहरम होऊन परत फिरू नका आणि सकारात्मकतेने उद्योग करा. आपल्या व्यवसायामध्ये नावीन्य ठेवा, यश तुमचेच आहे, असा सल्ला रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या संचालिका तथा सन 2016 चा उंच माझा झोका पुरस्कार प्राप्त डॉ. स्मिता लेले यांनी उद्योजकांना दिला आहे.

डॉ. स्मिता लेले, संचालिका, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई

हेही वाचा - रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या खडीमुळे बससेवा झाली बंद; विद्यार्थ्यांना पायपीट करत गाठावी लागते शाळा

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्री समारंभाप्रसंगी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन तुळजापूर येथील नवदुर्गा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या भारताबाई देवकर यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा - जालन्यात व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या

पुढे बोलताना डॉ. लेले म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठा विचार करून देशातला पैसा देशातच ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्यवसाय वाढीसाठी आपले उत्पादन परदेशात कसे पाठवता येईल? ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे. विज्ञानाचा फायदा घेऊन अत्याधुनिक व्यवसाय करता येऊ शकतात. आपल्या आयुष्याची गुणवत्ता ही विज्ञानामुळे सुधारु शकते. परंतु, त्याचा वापर कसा करायचा? हे मानसांनी ठरविले पाहिजे, असे लेले यांनी सांगितले.

Intro:एकदा उद्योगांमध्ये पडल्यानंतर उद्योजकांचा धर्म स्वीकारला पाहिजे, त्यामध्ये नामोहरम होऊन परत फिरू नका .आणि सकारात्मकतेने उद्योग करा आपल्या व्यवसायामध्ये नावीन्य ठेवा यश तुमचेच आहे. असा सल्ला रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई च्या संचालिका तथा सन 2016 चा उंच माझा झोका पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. स्मिता लेले यांनी आज दिला. देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्री समारंभाप्रसंगी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन तुळजापूर येथील नवदुर्गा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या सौ. भारताबाई देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहकार भारतीच्या अखिल भारतीय मंत्री संध्या कुलकर्णी .महाराष्ट्र सहकार भारतीच्या प्रदेश महिला व बचत गट प्रमुख सौ रेवती शेंदुर्णीकर. देवगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजू भालेराव, आदींची उपस्थिती होती.

Body:पुढे बोलताना डॉ. लेले म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठा विचार करून देशातला पैसा देशातच ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .आणि व्यवसाय वाढीसाठी आपले उत्पादन परदेशात कसे पाठवता येईल ते ज्ञानही आत्मसात केले पाहिजे .विज्ञानाचा फायदा घेऊन अत्याधुनिक व्यवसाय करता येऊ शकतात ,आपल्या आयुष्याची गुणवत्ता ही विज्ञानामुळे सुधारु शकते ,परंतु त्याचा वापर कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. वैज्ञानिकांचे काम आहे शक्तीचा शोध लावणे या शक्तीचा प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने सकारात्मकतेने वापर केला पाहिजे .आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो हेच विज्ञान पूर्वी जादू म्हणून ओळखले जात होते .त्यामुळे आतादेखील या जादूचा वापर केला पाहिजे .असेही डॉ. लेले म्हणाल्या.
मस्तगड परिसरात आज आणि उद्या संक्रांतीच्या निमित्ताने दोन दिवसीय महा एक्सपो चे आयोजन करण्यात आले आहे. हा एक्सपो पूर्णतः महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी आहे त्यामुळे इथे महिलांनी, बचत गटांनी तयार केलेले विविध प्रकारचे कलाकुसर, खाद्यपदार्थ, घरगुती वापराचे साहित्य उपलब्ध आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भगूरकर यांनी केले तर देवगिरी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सौ. मगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.