ETV Bharat / state

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जिल्हा प्रशासनाकडून संगोपन - जालना जिल्हा न्यूज अपडेट

कोरोनामुळे जर आई-वडिलांचे निधन झाले असेल तर अशा बालकांचे संगोपन जिल्हा प्रशासन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे जर एखाद्या बालकाचे पालक आई-वडील देन्ही किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या संगोपनाची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार आहे. नागरिकांनी अशा बालकांची माहिती 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी अंस आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जिल्हा प्रशासनाकडून संगोपन

author img

By

Published : May 24, 2021, 10:28 PM IST

जालना - कोरोनामुळे जर आई-वडिलांचे निधन झाले असेल तर अशा बालकांचे संगोपन जिल्हा प्रशासन करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे जर एखाद्या बालकाचे पालक आई-वडील देन्ही किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या संगोपनाची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार आहे. नागरिकांनी अशा बालकांची माहिती 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी अंस आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.

जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभाकरता कृतीदलाची (टास्क फोर्स)ची स्थापना करण्यात आली असून अशा बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्प लाईन नं. 1098 या क्रमांवर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, या बाबतचे माहितीफलक सर्व रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला देण्यात आल्या.

कोव्हीड 19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा एका पालकाचे निधन झाले असेल, अशा बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात यावी. अशा पालकत्व गमावलेल्या बालकांना त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे. तसेच या बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याकरता दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिल्या.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे जिल्हा प्रशासनाकडून संगोपन

जिल्ह्यातील 71 बालकांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू

जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड 19 आजारामुळे एक पालक गमावलेले 0 ते 6 वयोगटातील 17 तर 7 ते 18 वर्षे वयोगटातील 54 असे एकूण 71 बालके असून या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

'या' नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन

कोविड-19 मुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098, महिला व बालविकास विभाग मदत क्रमांक 8308992222,7400015518, बालकल्याण समिती जालना 9890841439, अधीक्षक, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह 9404000405, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- 7972887043, 8830507008 अथवा जिल्हा महिला व बालकविकास अधिकारी कार्यालय, जालना 02482-224711 या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा - तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस - केंद्र सरकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.