जालना - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे लष्करी अळी, बोंडअळीने प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे कृषी विभागही सजग झाला असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध प्रयोग व कीटकनाशके वाटप करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची बातमी 4 दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने केली होती.
हेही वाचा - केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी वाचला राज्य शासनाने केलेल्या कामांचा पाढा
कृषी विभागाने या अळीचा प्रतिबंध करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पाटील यांनी तालुक्यातील गोकूळवाडी येथील कृष्णा भंडागे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बोंडअळीचे नियंत्रण कसे शक्य आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ट्रायकोग्रामा या कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - मजबूत महाराष्ट्राला विरोधकांनी अस्थिर केले - जे. पी. नड्डा
यावेळी ट्रायकोग्रामा हे कीटकनाशक गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कसे कार्य करते, हे पाटील यांनी उपस्थितांना दाखवले. यावेळी राहुल नागरे, एम. बी. लांडे, निखील सुकलवाड यांच्यासह गोकूळवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा - जालन्यात गॅस टँकर उलटल्याने चार तास वाहतूक खोळंबली
कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांच्या शेतात येऊन बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्श्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. तसेच लष्करी अळीचा नायनाट करण्यासाठीही उपाययोजना कृषी विभागाने कराव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.