जालना - गणपती म्हटले की संकष्टी चतुर्थी हा दिवस महत्त्वाचा. म्हणूनच या दिवशी भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनाला भक्तांची गर्दी असते. मात्र, आज चतुर्थीला या भव्यदिव्य मंदिरात शुकशुकाट आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांविना परिसर सुना-सुना आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर बंद आहे. प्रचंड मोठा गाभारा, सोनेरी कळस आणि सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये पांढरे शुभ्र चमकणारे संगमरवर, हे या मंदिराचे आकर्षण आहे. भाविक गणपतीच्या दर्शनासाठी तर येतातच, मात्र मंदिराची आकर्षक वास्तूही मन प्रसन्न करते. अन्य वेळी गर्दी कमी असली, तरी चतुर्थीला मात्र भाविकांची प्रचंड गर्दी असते. आज चतुर्थी असली तरी, भाविकांना गाभार्यापर्यंत प्रवेश नाही. मात्र, मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्याच पायरीवर भाविक माथा टेकवत दर्शन घेत आहेत.
मंदिर उघडले पाहिजे
गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर बंद आहे. मात्र, येथील गुरव, पुजारी नित्यनियमाने पूजापाठ आणि मंदिराची स्वच्छता ठेवत आहेत. दीड महिन्यापूर्वी या मंदिराच्या गुरव पुजाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मंदिर सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, निगडीत असलेल्या अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने राज्यभरातील मंदिर खुले करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.
हेही वाचा- जालन्यात शिपायाकडून लाच घेणाऱ्या संस्था अध्यक्षाला रंगेहाथ अटक