ETV Bharat / state

पैसे परत जाण्याच्या अफवेने बँकेत गर्दी

बदनापूर तालुक्यातील बँकासमोर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांना बँक कर्मचाऱ्यांकडून व पोलिसांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यावेळी गर्दीतील अनेक लोकांनी साहेब, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमके काय हो ? असा प्रश्न करत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळायचे कसे ? असा भला मोठा प्रश्न बँक प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. शनिवार, रविवार व मंगळवार असे तीन दिवस सुटीचे आल्यामुळे सोमवारी (दि. 13 एप्रिल) बँकासमोर प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

बँकेसमोर गर्दी
बँकेसमोर गर्दी
author img

By

Published : Apr 14, 2020, 1:15 PM IST

बदनापूर (जालना) - सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व जनधन खात्यात तीन महिने प्रत्येकी पाचशे रुपये आलेले पैसे काढण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंगबाबत ग्रामीण भागात नसलेल्या जागृकतेमुळे बँकासमोर प्रचंड गर्दी होत आहे. सलगच्या सुट्या तसेच पैसे परत जाणार असल्याच्या अफवेमुळे गर्दी होत असल्याचे दिसून आले.

पैसे परत जाण्याच्या अफवेने बँकेत गर्दी
बदनापूर तालुक्यातील बँकासमोर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांना बँक कर्मचाऱ्यांकडून व पोलिसांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यावेळी गर्दीतील अनेक लोकांनी साहेब, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमके काय हो ? असा प्रश्न करत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळायचे कसे ? असा भला मोठा प्रश्न बँक प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. शनिवार, रविवार व मंगळवार असे तीन दिवस सुटीचे आल्यामुळे सोमवारी (दि. 13 एप्रिल) बँकासमोर प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक असले तरी ग्राहकांची मोठी संख्या विचारात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळायचा कसा ही बँक प्रशासनाची डोकेदुखी होवून बसली आहे. शासनाच्या वतीने शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तर महिलांच्या जनधन खात्यावर 500 रुपये जमा करण्यात आलेले आहे. हे पैसे काढण्यासाठी लाख मोलाचा जीव धोक्यात घालून बँकेसमोर गर्दी होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने दिसून येत होत्या. यावेळी गर्दी का करता असा प्रश्न केला असता सध्या लॉकडाऊनमुळे पैसे नसल्याचे सांगितले जात असले तरी काहींनी हे पैसे काढले नाही तर परत जाणार असल्‍याचे सांगितले.

सोमवारी शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर प्रचंड गर्दी दिसून आली. याबाबत महाराष्ट्र बँकेचे बदनापूर शाखाधिकारी चेतन वानखेडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सध्या जनधन योजनेत महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये तर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा झालेले आहेत. महिलांच्या खात्यावर तीन महिने प्रत्येकी 500 रुपये जमा होणार आहे. परंतु ग्रामीण भागात अशी अफवा आहे की, हे पैसे काढले नाही तर ते वापस जाणार त्यामुळे ग्राहक बँकेत गर्दी करत आहेत. आम्ही बँकेबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात केलेला असून ते सोशल डिस्टेन्सिंग ठेऊन पाच पाचच्या गटाने ग्राहकांना सोडतात. आम्हीही ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग फायदा समजून सांगत सेवा देत असलो तरी ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय हेच समाजावून सांगावे लागत आहे. आमच्या शाखेने जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी वार ठरवून दिलेले असल्यामुळे काही प्रमाणात गर्दी आटोक्यात ठेवण्यात यश आलेले आहे. तथापि, कुणाचेही पैसे परत जाणार नसून बँकेच्या ग्राहकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पैसे काढावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

हेही वाचा - लॉकडाऊन : मुक्या प्राण्यांना दिला घासातला घास, जालन्यातील तरुणाची भूतदया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.