ETV Bharat / state

परिचारिकेतील वात्सल्य; दीड वर्षाच्या मुलीला झोपेत ठेवून 'दाम्पत्य' आले ड्युटीवर - jalna corona

मुलगी जर जवळ राहिली असती तर तिला संसर्ग होण्याची भीती नेहमी वाटत राहिली असती. आज मुलीला भेटता येत नसले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिच्यासोबत बोलता येते, तिला पाहता येते. यातच अनुजा यांना समाधान आहे.

जालना
जालना
author img

By

Published : May 1, 2020, 8:04 PM IST

Updated : May 1, 2020, 11:17 PM IST

जालना - कर्तव्यापुढे वात्सल्यावर पाणी सोडत आणि काळजावर दगड ठेवत दीड वर्षाच्या मुलीला झोपेत सोडून अनुजा अशोकराव दानी-कुलकर्णी ही परिचारिका सध्या जालना येथील कोरोनाच्या रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहे. विशेष म्हणजे यांचे पती देखील औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कर्मचारी आहेत. त्यामुळे दोघांनाही अत्यावश्यक सेवेसाठी हजर व्हावे लागले आणि आपल्या दीड वर्षाच्या मुलीला आजी-आजोबांकडे सोडावे लागले.

जालना

अनुजा दानी यांचे लग्न बुलढाणा येथील कल्पेश कुलकर्णी यांच्याशी झाले. दीड वर्षापूर्वी त्यांना मुलगी झाली आणि अवनी नाव ठेवले. पती-पत्नी दोघेही नोकरी करत असल्यामुळे मध्यवर्ती ठिकाण म्हणून त्यांनी जालना निवडले आणि अनुजा यांचे पती कल्पेश हे जालना-औरंगाबाद वेळेनुसार जाणे-येणे करायला लागले. दरम्यानच्या काळात हे दोघेही गुढीपाडव्यासाठी बुलढाणा येथे गेले आणि कोरोनामुळे टाळेबंदी सुरू झाली. अशा परिस्थितीमध्ये मुलीला इकडे आणायचे कसे? आणि अशा अत्यावश्यक सेवेच्या दिवसात या मुलीचा सांभाळ कोण करणार? हा मोठा यक्ष प्रश्न या दाम्पत्या समोर उभा राहिला. शेवटी मुलीला आजी-आजोबांकडे सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुपारच्या वेळी दीड वर्षाची मुलगी गाढ झोपेत असताना या दोघांनी काळजावर दगड ठेवत बुलढाणा सोडले.

सध्या अनुजा दानी या जालना येथील कोविड रुग्णालयात परिचारिका म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मुलीला सोडून यावे लागले, याचे जरी वाईट वाटत असले तरी घरच्यांचा चांगला पाठिंबा आहे, त्यामुळे ते मुलीला संभाळत आहेत आणि कर्तव्य देखील महत्त्वाचेच आहे, असे त्या म्हणतात. मुलगी जवळ नसल्यामुळे आपण या कोविड रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारे, निर्भीडपणे सेवा देत असल्याचे त्या सांगतात. कारण मुलगी जर जवळ राहिली असती तर तिला संसर्ग होण्याची भीती नेहमी वाटत राहिली असती. आज मुलीला भेटता येत नसले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिच्यासोबत बोलता येते, तिला पाहता येते. यातच अनुजा यांना समाधान आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनुजा यांचे पती कल्पेश कुलकर्णी यांचीदेखील भेट झालेली नाही. मात्र, दोघेही कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या परतूर येथील महिलेवर देखील त्यांनी उपचार केले होते. मात्र, कोणतीही भीती मनामध्ये न बाळगता आपण परिचारिका आहोत आणि आपले ते आपले कर्तव्य आहे, असे त्या मानतात. दीड वर्षाच्या मुलीला झोपेत सोडून येणाऱ्या या दाम्पत्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

Last Updated : May 1, 2020, 11:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.