जालना - अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्य टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान जालन्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये आज लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
डाॅ. पद्मजा श्रॉफ ठरल्या लसीकरणाच्या पहिल्या मानकरी
साहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पद्मजा श्रॉफ आणि कोविड विभागाचे प्रमुख डॉ. संजय जगताप हे कोरोना लसीचे पहिले लाभार्थी ठरले आहेत. या दोघांचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान त्यापूर्वी लसीकरण उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. हे भाषण आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांच्यासह माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऐकले आणि त्यानंतर लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.