ETV Bharat / state

वाढत्या गर्दीमुळे जालन्यात कोरोनाचा प्रसार; बाजारपेठेतील अतिक्रमणं हटवली - jalna corona news

जालना शहरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. सुरुवातीचा एक महिना गेल्यानंतर व्यापाऱ्यांनीच दुकाने सुरू करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला होता. मात्र, प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरून वारंवार सूचना देऊन गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

jalna
बाजारपेठेतील अतिक्रमणं हटवली
author img

By

Published : Jul 9, 2020, 5:53 PM IST

जालना - शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यावर दोन्ही बाजूने लाकडी फळ्या टाकून केलेले अतिक्रमणामुळे शहरात नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. यामुळेच जालन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच कोरोनाने येथील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे व्यापाऱयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटवले आहे.

वाढत्या गर्दीमुळे जालन्यात कोरोनाचा प्रसार

जालना शहरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. सुरुवातीचा एक महिना गेल्यानंतर व्यापाऱ्यांनीच दुकाने सुरू करण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरला होता. मात्र, प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरून वारंवार सूचना देऊन गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली नाही. याचा परिणाम असा झाला की, पोलिसांची गाडी दिसली की दुकाने बंद आणि गाडी पुढे गेल्यानंतर पुन्हा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी वाढली. बाजारात देखील गर्दी वाढली आणि या गर्दीमुळे काही डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली.

हा प्रकार उशिरा का होईना व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे, यापार्‍यांनी पुन्हा स्वतःहून जून महिन्यामध्ये 19, 20 आणि 21 असा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू केला होता. हा कर्फ्यू लागू करण्यामध्ये कोरोनामुळे मृत व्यापार्‍याने देखील पुढाकार घेतला होता. याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, त्यानंतर पुन्हा दुकाने सुरू झाली आणि शहरातील मध्यवर्ती असलेल्या दाणाबाजार, खवा मार्केट, सावरकर चौक, फुलबाजार, नेहरू रोड, भाजी मंडई या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

दरम्यान, हा परिसर व्यापारी पेठ आहे. या परिसरात व्यापाऱ्यांची दोन-तीन मजली घरे आहेत. घरातील वाहनांची संख्या, कामगारांची संख्या लक्षात घेता कुठेही जागा नाही. त्यातच वरच्या मजल्यावर घर, खालच्या मजल्यावर दुकान आणि दुकानासमोरील ओट्यावर आणखी एक छोटेसे दुकान, यामुळे या भागांमध्ये प्रचंड गर्दी होते.

दरम्यान, या गर्दीतूनच कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. म्हणूनच व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने या भागातील अतिक्रमणे हटवली आहेत. पुन्हा आता दहा तारखेनंतर कर्फ्यू उठल्यावर अशीच गर्दी या व्यापाऱ्यांच्या घरासमोर दुकानांसमोर राहणार का? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.