जालना - जालना लोकसभा मतदारसंघाच्या अकराव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना सुमारे दीड लाख मतांची आघाडी मिळाली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी थेट मतदान यंत्रावरच खापर फोडत, ही सर्व मतदानयंत्राची करामत असल्याचे म्हटले आहे.
औताडे म्हणाले, ही सर्व मतदानयंत्राची करामत आहे. आमचा पहिल्यापासूनच ईव्हीएम मशीनवर विश्वास नव्हता. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. आम्ही यापुढेही जनतेची सेवा करू.
काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांनी मतदान केंद्राहून काढता पाय घेतला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मतमोजणी केंद्रावरून एक्झिट करण्यापूर्वी विलास आवताडे यांनी सर्वांसाठी असलेल्या भोजन कक्षामध्ये आपल्या दोन सहकाऱ्यांसह भोजन केले.