जालना - शहरात आजपासून कापूस निगम लिमेटेड 'सीसीआय'च्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही कापूस खरेदी सुरू आहे. माजी मंत्री व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर व बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांच्या उपस्थितीत खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
लॉकडाउन झाल्यास खरेदी थांबणार नाही
राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर सरकार लॉकडाऊन करू शकते. मात्र या लॉकडाऊनचा परिणाम कापूस खरेदीवर होणार नाही. कापूस खरेदी सुरूच राहील, अशी माहिती खोतकर यांनी दिली. दरम्यान आज पहिल्याच दिवशी कापूस खरेदीसाठी प्रति क्विंटल 5 हजार 725 रुपयांचा दर देण्यात आला आहे.