जालना- मका खरेदी करण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली.
भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील मोरेश्वर व पूर्ण खरेदी विक्री संघामध्ये मक्का खरेदीत शेतकऱ्याची भरपूर प्रमाणात पिळवणूक केली आहे. यामध्ये होत असलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची तसेच सर्व गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी बाळासाहेब पाटील यांच्याकडे चंद्रकांत दानवे यांनी केली.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांकडे अजूनही भरपूर प्रमाणात मका पडून आहे. त्यामुळे सदरील मका खरेदी व्हावी यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने मका खरेदीची मुदत यापूर्वी 31 जुलै पर्यंत वाढवली होती.