जालना - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह भोकरदन येथील निवासस्थानी धुळवड ( Raosaheb Danve Dhulivandal celebration ) साजरी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना ( Raosaheb Danve birthday celebration ) रंग लावत धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी मोठे राजकीय विधान केले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve on Mahavikas Aghadi ) म्हणाले, की महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज आहेत. हे सर्वच आमदार विधिमंडळ अधिवेशनावर बहिष्कार टाकणार ( 25 MLAs in MH ) होते, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला. तसेच या सर्व आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांना सावरले. निवडणूक येऊ द्या, हे सर्व एकेक आमदार भाजपच्या तंबूत येतील असा दावाही दानवे यांनी केला. मात्र, नाराज असलेले 25 आमदार कोण आहेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
हेही वाचा-हेही वाचा-Mumbai Police Band Plays Srivalli Song : मुंबई पोलिसांच्या बँन्ड पथकाला Pushpa चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची भुरळ
तपास यंत्रणांचा कोणताही दुरुपयोग होत नाही-रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरदेखील टीका केली. भेसळ आमच्या पक्षात नसून महाविकास आघाडी हीच भेसळ असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणांचा कोणताही दुरुपयोग होत नसल्याचेदेखील दानवे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-हेही वाचा-Mumbai Police Band Plays Srivalli Song : मुंबई पोलिसांच्या बँन्ड पथकाला Pushpa चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची भुरळ
हॉटेलचे बिल न भरल्याने आले होते चर्चेत
रेल्वेच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या उद्घाटनानिमित्त ठाण्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मंत्री आणि भाजपचे नेते 18 फेब्रुवारीला गेले होते. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर वडा पावच्या दुकानात नाश्ता केला होता. या नाश्त्याचे बिल न भरताचे ते निघून गेले ( Raosaheb Danve Left Hotel Without Paying Bill In Thane ) होते. दोन हजार रुपयांचे हे बिल न भरल्याबाबत बातमी प्रकाशित करताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये येत बिल भरले ( Hotel Bill Paid By BJP Worker In Thane ) होते.
ऑपरेशन लोटस ( Operation Lotus in MH ) की स्थिर सरकार?
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता येईल, असा दावा यापूर्वीही भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबविले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेत्यांकडून राज्यातील सरकार स्थिर असल्याचा दावा करण्यात येतो.