जालना - शहरातील तब्बल २१ भू-माफियांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सर्वे क्रमांक १७३ मधील जमिनीची बनावट कागदपत्र देऊन अकृषिक परवाना काढल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
नवीन जालना भागात असलेली सर्वे क्रमांक १७३ ही जमीन रंगनाथआप्पा तुकारामआप्पा काटकर आणि त्यांच्या भावकीच्या नावावर आहे. सदरील मिळकत ही वर्ग प्रकरण २ मध्ये असल्यामुळे या जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी अकृषिक परवाना असावा लागतो. त्यासाठी शासन दरबारी काही ठराविक रक्कम भरून तो परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळविण्यासाठी काटकर आणि अन्य २१ जणांनी सर्वे क्रमांक १७३ मधील उर्वरित जमीनीचा अकृषिक परवाना भरल्याची कागदपत्रे जोडून शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तर, शासकीय अधिकाऱ्यांनीही सादर केलेल्या कागदपत्रावरून त्यांना अकृषिक परवाना दिला आहे.
हेही वाचा - जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांना अटक
अकृषिक परवान्याच्या आधारे या प्रकरणातील आरोपी रंगनाथआप्पा काटकर, प्रकाश रंगनाथ काटकर, लक्ष्मण तुकारामआप्पा काटकर, कचरू लक्ष्मणआप्पा काटकर, नारायण लक्ष्मणआप्पा काटकर, कैलास लक्ष्मण आप्पा काटकर, शिवा काटकर, निरंजन काटकर, केसरबाई काटकर, अमोल काटकर, भास्कर तात्याराव खुळे, सुमनबाई पाराजीआप्पा औरंगे, सुमनबाई लक्ष्मणआप्पा औरंगे, गंगा अशोक नामदे, सुनिता परळकर, हर्ष सुनील बोरा, श्रिया दीपक गेलडा, सचिन भानुदास मिसाळ, रश्मी विनोद भरतीया, संतोष पन्नालाल करवा, यांच्यासह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध अरुण श्रीकिशन अग्रवाल (वय 52, रा. शिवाजी पुतळा जवळ जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - टॅलेंट सर्च करून विद्यार्थ्यांना दिले 'हैदराबाद' सहलीचे बक्षीस