ETV Bharat / state

चाकूने वार करत व्यापाऱ्यांचे दीड लाख पळविले; गुन्हा दाखल - jalna crime news

जालन्यातील बसस्थानक ते ईदगाह मार्गावर एका व्यापाऱ्याला चाकूने वार करत लुटल्याची घटना बुधवारी (दि. 18) घडली आहे.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 21, 2021, 3:31 PM IST

जालना - आलं-लसूण विकणाऱ्या व्यापाराला मारहाण करत त्याच्याकडील दीड लाख रुपये पळविल्याची घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. समीर पी. शेख (वय 28 वर्षे, रा. दुखी नगर), असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, समीर शेख यांचा आलं-लसूण विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समीर हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच 21 बी एन 4936) वरुन दुखी नगर येथून बसस्थानकमार्गे ईदगाहकडे जात होते. ईदगाड जवळील पुलाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोघांनी समीर यांच्या पाठीत चाकू मारला. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला.

खराब रस्ता असल्याने कोणीही या रस्त्याकडे जात नाहीत

जालना बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या बाजूने जाणार रसत्ता अडचणीचा व खराब असल्यामुळे सायंकाळी सहाच्या नंतर या रस्त्याने कोणीही जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर अंधार पडला की अशा घटना नेहमीच होतात. मात्र, किरकोळ घटना असल्यामुळे कोणीही पोलिसांपर्यंत जात नाही. पण, बुधवारची घटना मोठी असल्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

हेही वाचा - दुचाकीवर पडलेल्या सापापासून बचावले दोन पोलीस कर्मचारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.