ETV Bharat / state

वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले

परतूर तालुक्यातील सातोना येथील शाखा अभियंता अमोल मोहितेला शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

author img

By

Published : Aug 29, 2019, 11:07 PM IST

वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याला लाच घेताना पकडले

जालना - परतूर तालुक्यातील सातोना येथील शाखा अभियंता अमोल मोहितेला शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर जास्तीची विद्युत जोडणी असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याने स्वखर्चाने दोन रोहित्र बसवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर या कामासाठी तयार करण्यात आलेले खर्चाचे अंदाजपत्रक वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्याची विनंती अभियंता मोहितेकडे केली होती. मात्र, त्यासाठी मोहिते याने तक्रारदार शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. ही लाच घेताना मोहिते यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे वीज वितरण कंपनीच्या अभियंता आणि कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Intro:
परतूर तालुक्यातील सातोना येथील शाखा अभियंता अमोल मोहिते यांना तक्रारदार शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयांची लाच घेतांना जालना येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.वीज वितरण कंपनीच्या रोहित्रावर जास्तीचे कनेक्शन असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता.त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याने स्वखर्चाने दोन रोहित्र बसवण्याची तयारी दर्शवून या कामासाठी तयार करण्यात आलेले खर्चाचे अंदाजपत्रक वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्याची विनंती अभियंता मोहितेकडे केली होती. मात्र त्यासाठी मोहिते यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाच घेतांना मोहिते यास रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे वीज वितरण कंपनी च्या अभियंता व कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.Body:आपल्याकडे acb चे विजवल सेव्ह आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.