ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे ताम्हण-पळी आंदोलन

विविध मागण्यांसाठी जालन्यातील चमन परिसरात ताम्हण-पळी वाजवा आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:26 PM IST

Updated : Jan 19, 2021, 3:40 PM IST

जालना - ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या समाजाने जुन्या जालन्यातील चमन परिसरात ताम्हण-पळी वाजवा आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

बोलताना दीपक रणनवरे

चमन परिसरात ताम्हण-पळीचा आवाज

अन्य आंदोलनामध्ये येणाऱ्या आवाजापेक्षा या आंदोलनात ताम्हण-पळी वाजवली गेली. तांब्याच्या धातूचे एका हातामध्ये ताम्हण आणि दुसऱ्या हातामध्ये संध्या करण्याची पळी घेऊन या समाजाने ताम्हण-पळी वाजवत आंदोलन केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीदेखील ताम्हण-पळी वाजवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

या आहेत मागण्या

  1. समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे.
  2. प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करावे.
  3. केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे
  4. ब्राह्मण समाजावर बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच कारवाई करण्यात यावी.
  5. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.
  6. ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.
  7. पुरोहित समाजाला मासिक पाच हजार रुपयांचे मानधन सुरू करण्यात यावे. यासह अन्य मागण्या होत्या.

हेही वाचा - जालना जिल्ह्यातील मेटारोल इस्पात कंपनीत स्फोट; १ ठार, १ जखमी

Last Updated : Jan 19, 2021, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.