ETV Bharat / state

बायको सोडून गेली, प्रेयसीचेही लग्न झाल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

पत्नीला प्रेमसंबंध कळले, त्यामुळे पत्नी सोडून गेली. प्रेयसीचे लग्न झाल्याने राग अनावर झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला.

author img

By

Published : Dec 25, 2019, 11:59 PM IST

चंदनझिरा पोलीस ठाणे
चंदनझिरा पोलीस ठाणे

जालना - पत्नीला प्रेमसंबंध कळले, त्यामुळे पत्नी सोडून गेली. प्रेयसीचे लग्न झाल्याने राग अनावर झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून तिच्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचे मेसेज टाकत आत्महत्येचा बनाव केला. या प्रकरणी खून प्रियकर सचिन गायकवाड सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.

माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी

याबाबत सविस्तर वृत्त असे, चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सचिन गायकवाडचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. पण, सचिनने दुसऱ्या मुलीसह विवाह केला. नंतर सचिनच्या पत्नीला त्याचे प्रेमसंबंध कळले. त्यामुळे ती सचिनला सोडून आपल्या माहेरी गेली. त्यानंतर निराश झालेला सचिन आपल्या प्रेयसीशी संपर्क साधला. तिने शनिवारी (दि. 21 डिसें.) अंबड येथे आईस्कीम खाण्यासाठी बोलवले. त्याच्या विनंतीला मान देत प्रेयसी सचिनला भेटायला गेली. त्यानंतर दोघेही शिंदेवाडी येथे त्यांच्या मित्राच्या घरी गेले.

मित्राच्या घरी कोणीच नव्हते. त्यानंतर सचिनने पत्नी सोडून गेल्याने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण, तिने तिच्या कुटुंबीयांना माहिती न देता, परतूर येथील एका युवकाशी नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. घरगुती कारणांमुळे नवऱ्याच्या संमतीने ती लग्नानंतरही आपल्या माहेरी राहत होती. तिने सचिनला विवाहाचे फोटोही दाखवले. त्यानंतर सचिनचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने ओढणीने तिचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

अंधाराचा फायदा घेत सचिनने तिचा मृतदेह रेल्वे रूळावर नेऊन टाकले. एवढ्यावरच न थांबता त्याने प्रेयसीच्या मोबाईलवरून नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रेयसीच्या नवऱ्याला ताब्यात घेतले. पण, तो घटनेच्या दिवशी तो जालन्यात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उत्तरीय तपासणीनंतर आत्महत्या नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी पोलिसात खुनाची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलत सचिनला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्हाची कबुली दिली.

या घटनेची उकल करण्याची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सुनील इंगळे, नंदलाल ठाकूर, महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा गायकवाड आदींनी पार पाडले.

हेही वाचा - जालन्यात अंगणवाडी महिला कर्मचारी उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

Intro:लग्नापूर्वी शेजारच्या मुली सोबत प्रेम संबंध जुळल्यानंतर या प्रियकराचे झालेले लग्न आणि त्यानंतर या तरुणीने ही केलेले लग्न सहन न झाल्याने जुन्या प्रियकराने नवविवाहितेचा खून केल्याची घटना शनिवार दिनांक 21 रोजी घडली मात्र .या प्रकाराचा आत्महत्या केल्यासारखा बनाव करून विवाहितेच्या पतिला या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुन्या प्रियकराला चंदंनजिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान एक किचकट प्रकरणाविषयी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसातच तपास लावला आहे.

बाईट- सुधीर खिरडकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालना

या बातमीतील अधिक फोटो रिपोर्ट ॲप वरून पाठवीत आहे

Body:चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मच्छोदरी महाविद्यालय जवळिल रेल्वे पटरीवर एका बावीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह ह् संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आढळून आला होता सदरील तरुणी ही घरातून चार वाजता झेरॉक्स काढून आणण्यासाठी निघाली होती मात्र ती परत आलीच नाही आणि नंतर सात वाजता हा प्रकार उघडकीस आला प्रेताच्या उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा खून असल्याचे तक्रार चंदंजिरा पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिस तपास करीत असताना सदरील युवतीने तिच्या मोबाईल वरून तिच्या नातेवाईकांना आपला विवाह झाला असल्याचे फोटो पाठवले होते आणि प्रत्यक्षात हा विवाहदेखील झालेला आहे कशा पद्धतीचे प्रमाणपत्रही ही त्यांच्याकडे आहे दरम्यान काही दिवसापूर्वी या तरुणीचे आणि तिच्या घराशेजारी राहणाऱ्या सचिन गायकवाड या दोघांचे प्रेमसंबंध होते त्यानंतर सचिन गायकवाड चे लग्न झाले आणि सचिनच्या पत्नीला या प्रेम संबंधाविषयी भनक लागल्याने तीदेखील माहेरी निघून गेली याच दरम्यान या मयत तरुणीचे आणि परतूर येथील अविनाश वंजारे यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला मात्र तरुणीच्या घरच्या काही अडचणीमुळे ती नांदण्यास जात नव्हती मात्र पती-पत्नीचे संबंध ध् जिव्हाळ्याचे होते आणि अविनाश वंजारे याच्या घरच्यांना देखील हे सर्व माहित होते हा सर्व प्रकार सचिन गायकवाडला आवडला नाही त्यामुळे म्हाडा कॉलनीत राहत असलेल्या सचिन गायकवाड या मुलीचा काटा काढण्याचे ठरविले त्यानुसार या मुलीला शनिवार दिनांक 21 रोजी चार वाजेच्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी अंबड रस्त्यावर बोलावले त्यानंतर हे दोघे शिंदेवाडी येथील मित्राच्या घरी गेले त्यावेळी त्या मित्राच्या घरी कोणीच नव्हते आणि तिथेच तरुणीने अविनाश वंजारे यांच्यासोबत लग्न केल्याचे फोटो दाखविले या फोटोमुळे गायकवाड यांची बायको एक वर्षापूर्वी सोडून गेली होती. यावेळी बोलताना तरुणी म्हणाली कि आता माझे लग्न झाले आहे यामुळे यापुढे तुला भेटता येणार नाही असे सांगितल्यामुळे गायकवाड यांचा राग अनावर झाला त्यामुळे गायकवाड यांनी या तरुणीने आत्महत्या केली आहे असा बनाव करण्यासाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने या तरुणीला रेल्वे पट्टी वर आणून टाकले आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला तसेच तिच्याच मोबाइलवरून तिच्याच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठविला आणि तिला रेल्वे पटरीवर आणून टाकले याप्रकरणाचा तपास करीत असताना मुलीच्या वडिलांनी हा खून असल्याची तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी प्रथम दर्शनी अविनाश वंजारे याला जबाबदार धरले होते आणि त्या दिशेने तपास सुरू केला होता मात्र ही घटना घडली त्यावेळी पवन अविनाश वंजारे हा बाहेरगावी असल्यामुळे पोलिसांनी वजारे याला पकडल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आणि गायकवाड याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान या सर्व गुंतागुंतीच्या तपासाची प्रक्रिया उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कोठाळे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले सुनील इंगळे नंदलाल ठाकूर महिला पोलीस कर्मचारी श्रद्धा गायकवाड आदींनी पार पाडले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.