कोरोना या महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने कदीम जालना पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एखाद्या शुभकार्याप्रमाणे इमारतीमध्ये रांगोळी, मंडप, कमान तयार करून उत्साहवर्धक वातावरण तयार करण्यात आले होतो. यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख आणि पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांची उपस्थिती होती.
रक्तदात्यांचा सत्कार
रक्तदान केलेला रक्तदात्यांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक निशा बनसोड, गणेश सोळुंके आदी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
200 बॅक रक्तसाठा करण्याचा संकल्प
दरम्यान या रक्तदान शिबिरामध्ये किमान 200 बॅग रक्तसाठा करण्याचा संकल्प पोलिसांनी केला आहे होता. अनेक नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्यामुळे देखील रक्तदान करता आले नाही. तसेच काहीजण पॉझिटिव्ह होऊन बरे झाले आहेत त्यामुळे देखील त्यांचे रक्त घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला, त्यामुळे देखील अनेक जण नाराज झाले आहेत.