जालना - पोलीस स्थापना दिवस अर्थात" रेझिंग डे". या निमित्त पोलिस प्रशासनाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले .
रेझिंग डे -
पोलीस स्थापना दिवस आणि या दिवशी पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने दरवर्षी जानेवारीचा पहिला आठवडा हा रेझिंग डे सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते .त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर पार पडले.
अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान -
या रक्तदान शिबिरात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी ही रक्तदान केले. यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश होता. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.