ETV Bharat / state

राज्य सरकारच्या निषेधार्थ जालन्यात भाजपचे आंदोलन - जालना न्यूज

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याचा निषेध म्हणून जालना शहरातील भाजप कार्यालयासमोर आज (शुक्रवार) निषेध आंदोलन करण्यात आले.

bjp workers agitaion against maharashtra govt in jalna
जालन्यात भाजपचे आंदोलन
author img

By

Published : May 22, 2020, 8:31 PM IST

जालना - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. याचा निषेध म्हणून जालना शहरातील भाजप कार्यालयासमोर आज (शुक्रवार) निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा. कपिल दहेकर यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध केला.

आमदार संतोष दानवे
यावेळी संतोष दानवे म्हणाले, की अन्य राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. तेथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. याउलट महाराष्ट्रात दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे. कारण कोणत्याही प्रकारचे नियोजन राज्य सरकारकडे नाही. वारंवार निर्णय बदलले जात आहेत. त्यामुळे कोणाला काय करायचे तेच सुचत नाही. याचा परिणाम कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यासोबत कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निधी दिला आहे. हा निधी कुठे वापरला? याचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली. यावेळी भास्कर दानवे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, बाबासाहेब कोलते आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.