जालना- भोकरदन पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा स्वस्त धान्य दुकानातील गव्हाचा ट्रक पकडला आहे. हा ट्रक स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भोकरदन ते सिल्लोड या रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास या ट्रकला पकडले.
कारवाईत पोलिसांनी ट्रक व गहू असा एकूण ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, पो.नि. दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप उगले, संजय क्षीरसागर, विजय जाधव, आदींनी केली आहे. दरम्यान, भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा- भोकरदन तहसील कार्यालयातून जेसीबी नेला पळवून