जालना - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालना शहरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी झोडपले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये जमा होत आज सायंकाळी 5 वाजता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी विविध घोषणा दिली.
यावेळी बजरंग दलचे शहर संयोजक अर्जुन डहाळे, आकाश सोनवणे, बालाजी नलमेल, ऋतुराज कदम, गौरव देशमाने, अमित आर्य, वेदांत खैरे, बालाजी पाटील, अक्षय तिपरास, शैलेस माधवाले आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नोकरच निघाला चोर, जालन्यात चौघांना अटक