ETV Bharat / state

जालना जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेत बदनापूर तालुका अव्वल - scholarship examination result

बदनापूर हा ग्रामीण तालुका असून शैक्षणिकदृष्टया मागासलेला म्हणून ओळखला जात होता. मात्र काही दिवसांपासून बदनापूरचा शिक्षण विभाग उत्कृष्ट काम करत हा ठसा पुसण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

Badnapur taluka tops in scholarship examination
शिष्यवृत्ती परीक्षेत बदनापूर तालुका अव्वल
author img

By

Published : Oct 18, 2020, 9:22 PM IST

बदनापूर - शिष्यवृत्ती परीक्षा २०२०मध्ये बदनापूर तालुक्याने बाजी मारली. जिल्ह्यातील आकडेवारी पाहता बदनापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला. बदनापूर हा ग्रामीण तालुका असून शैक्षणिकदृष्टया मागासलेला म्हणून ओळखला जात होता. मात्र काही दिवसांपासून बदनापूरचा शिक्षण विभाग उत्कृष्ट काम करत हा ठसा पुसण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती – २०२० परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालात ही बाब अधोरेखित झाली आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत बदनापूर तालुक्यातील ५३६ विद्यार्थी पात्र ठरले असून त्याची टक्केवारी ४५.४६ इतकी आहे. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील १७० विद्यार्थी पात्र ठरले असून त्याची टक्केवारी १७.१५ इतकी आहे. इयत्ता पाचवी परीक्षेसाठी तालुक्यातून १२२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी ११७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ५३६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

गटशिक्षणिकारी सूर्यकांत कडेलवार

इतर तालुक्याशी तुलना केली असता इयत्ता पाचवी पूर्व शिष्यवृत्तीमध्ये बदनापूर तालुक्यातील ५३६ विद्यार्थी पात्र (४५.४६ %), मंठा तालुका २७५ विद्यार्थी पात्र (३१.७६%), भोकरदन तालुका ३७१ विद्यार्थी पात्र (२१.४३), जाफराबाद तालुका १२८ विद्यार्थी पात्र (२०.३८ %), परतूर तालुका १७० विद्यार्थी पात्र (१७.१७ %), जालना तालुका ४१६ विद्यार्थी पात्र (१५.१५%), घनसावंगी तालुका १०७ विद्यार्थी पात्र (१३.४०%), अंबड तालुका १२८ विद्यार्थी पात्र (११.०७%),असे संपूर्ण जालना जिल्हयात एकूण २१२७ विद्यार्थी पात्र ठरले असून संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी २०.७८ इतकी आहे.

तर इयत्ता आठवीच्या निकालात बदनापूर तालुका १७० विद्यार्थी पात्र (१७.१५%), मंठा तालुका ८२ विद्यार्थी पात्र (१५.१२ %), भोकरदन १७९ विद्यार्थी पात्र (१३.४०%), जालना तालुका २३७ विद्यार्थी पात्र (११.३१ %), परतूर ४६ विद्यार्थी पात्र (७.४९ %), अंबड ११६ विद्यार्थी पात्र (३.३८%), घनसांवगी १७ विद्यार्थी पात्र (३.३८%), जाफराबाद १५ विद्यार्थी पात्र (२.९२%), तर संपूर्ण जालना जिल्हयात एकूण ८६२ विद्यार्थी पात्र ठरलेले असून जिल्ह्याची टक्केवारी १०.५८ इतकी आहे.

या बाबत माहिती देताना गटशिक्षणिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व शिक्षक, गटसमनव्यक, मुख्याध्यापक व शिष्यवृत्ती विभागाचे संजय जाधव यांनी मार्गदर्शन केल्यामुळेच इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्य्वृत्ती परीक्षेत बदनापूर तालुक्याने जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहाव्या वर्ग परीक्षेसाठी होणारी पूर्वपरीक्षेचा ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या तारखा सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ ते अर्ज दाखल करावे, असे आवाहनही सूर्यकांत कडेलवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.