ETV Bharat / state

पत्रकारांचा ससेमिरा टाळत खासदार दानवे भोकरदनकडे रवाना - raosaheb danve news

शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेत असलेले केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांचा ससेमिरा टाळला.

Avoiding media, MP raosaheb danve left for Bhokardan
पत्रकारांचा ससेमिरा टाळत खासदार दानवे भोकरदनकडे रवाना
author img

By

Published : Dec 13, 2020, 5:35 PM IST

जालना - शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेत असलेले केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकारांचा ससेमिरा टाळला आणि जालन्यातील कार्यक्रम आटोपून थेट भोकरदनकडे रवाना झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी
जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयांमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती होती. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता. त्यानुसार आज सकाळपासूनच पत्रकारांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी चकरा मारणे सुरु केले होते.

शेवटी साडेतीन वाजता कार्यक्रम झाला. यानंतर शाळेच्या प्रांगणातच खासदार दानवे यांना पत्रकारांनी घेरले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी नको म्हणून गेटच्या बाहेर वाईट देतो असे सांगितलं. पत्रकारांनी पुन्हा गेटच्या बाहेर त्यांना घेरले. त्यानंतर तुम्हाला बाईट देतो म्हटलं, तरी तुम्ही ऐकत नाहीत, असे म्हणत, गाडीमध्ये बसून सरळ भोकरदनकडे रवाना झाले. एकंदरीत एरवी नेहमी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणारे खासदार दानवे यांनी मात्र आज पत्रकारांना बोलणे टाळले.

रावसाहेब दानवे पत्रकारांना टाळत गाडीकडे जाताना...

काय म्हणाले होते दानवे

सध्या सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. आधी देशातील मुस्लीम समाजाला उचकवले. त्यांना सांगितले की, सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचे सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचे षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे, असे वक्तव्य दानवे यांनी केले होते.

हेही वाचा - वेडाच्या झटक्यामध्ये बरळणाऱ्या दानवेंचे तोंड काळे करणार; खोतकरांचा इशारा

हेही वाचा - शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.