ETV Bharat / state

टोळक्याचा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला - पोलीस सतर्क

जुन्या वादातून झालेल्या भांडणातून एका जणाच्या घरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने सतर्कता दाखवून रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या पोलीस हवालदाराने थेट पिस्तूल रोखल्यामुळे टोळक्यातील काही जण शस्त्रे आणि वाहने जागीच सोडून पसार झाले आहेत.

जालना
author img

By

Published : Aug 27, 2019, 8:34 AM IST

जालना - जुन्या वादातून झालेल्या भांडणातून एका जणाच्या घरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने सतर्कता दाखवून रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या पोलीस हवालदाराने थेट पिस्तूल रोखल्यामुळे टोळक्यातील काही जण शस्त्रे आणि वाहने जागीच सोडून पसार झाले आहेत. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल ढाकणे, वैभव ढाकणे, लॉयल ढाकणे यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ४ वाहनेही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आली आहेत.

याबाबत माहिती अशी की, जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाजवळील बुंदेले चौकातील मंगलसिंग ठाकूर आणि मोदीखाना भागातील राहुल ढाकणे यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद होऊन भांडण झाले होते. या भांडणातून मंगलसिंग ठाकूर याच्या घरावर सोमवारी (ता.२६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहुल ढाकणे, वैभव ढाकणे या दोघासह १५ ते २० जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, चाकू, लाठ्या घेऊन थेट ठाकूर यांच्या घरात घुससे. त्यानंतर मंगलसिंग कुठे आहे, असे म्हणत घरातील महिला व वृद्धांना मारहाण केली. त्यानंतर मंगलसिंग ठाकूर यांची आई शोभा ठाकूर यांच्या गळ्यावर एका जणाने चाकू ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात या भागातून जात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे गेले.

आक्रमक टोळक्याच्या हातातील प्राणघातक शस्त्रे आणि घरातील दृश्य पाहून कांबळे यांनी स्वतःजवळील पिस्तूल टोळक्याच्या दिशेने रोखले व शोभा ठाकूर यांच्या गळ्यावरील चाकू वेळीच हिसकावून घेतला. यावेळी काही जण त्यांची वाहने व हत्यारे घटनास्थळीच सोडून पसार झाले.

यावेळी कांबळे यांनी एका हल्लेखोर तरुणास जागीच पकडले. तोपर्यंत घटनास्थळी सदर बाजार पोलीस दाखल झाले होते. या टोळक्यातील ६ जणांना चार दुचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे. यावेळी बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक रमेश रुपेकर, उपनिरीक्षक निशा बनसोड हे घटनास्थळी आले होते.

याप्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात शोभा मोहनसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून राहुल ढाकणे, वैभव ढाकणे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:

प्राणघातक हल्ल्याचा सशस्त्र टोळक्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला

जुन्या वादातून झालेल्या भांडणातून एका जणांच्या घरावर चाल करून वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून जीवे मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या सशस्त्र टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका बहाद्दर पोलीस हवालदाराने सतर्कता दाखवून रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या पोलीस हवालदाराने थेट पिस्तूल रोखल्यामुळे टोळक्यातील काही जण शस्त्रे आणि वाहने जागीच सोडून पसार झाले आहेत. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राहुल ढाकणे, वैभव ढाकणे, लॉयल ढाकणे यांच्यासह सहा जणांना पकडले आहे. तसेच, ४ वाहनेही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आली आहेत.

याबाबत माहिती अशी कि, जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाजवळील बुंदेले चौकातील मंगलसिंग ठाकूर आणि मोदीखाना भागातील राहुल ढाकणे यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद होऊन भांडण झाले होते. या भांडणातून मंगलसिंग ठाकूर याच्या घरावर सोमवारी (ता.२६) दुपारी ३ वाजेच्या सुमारास राहुल ढाकणे, वैभव ढाकणे या दोघासह १५ ते २० जणांचे टोळके हातात तलवारी, चाकू, सुरे आणि स्टम्प, काठ्या- लाठ्या घेऊन दुचाकी वाहनावरून चालून गेले होते. हे टोळके आक्रमक होत थेट ठाकूर याच्या घरात घुसून मंगलसिंग कुठे आहे, असे म्हणत घरातील महिला व वृद्धांना मारहाण केली. त्यांनतर मंगलसिंग ठाकूर याची आई शोभा ठाकूर यांच्या गळ्यावर एका जणाने चाकू ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात या भागातून जात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सॅम्युएल कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे गेले. आक्रमक टोळक्याच्या हातातील प्राणघातक शस्त्रे आणि घरातील दृश्य पाहून कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःजवळील पिस्तूल टोळक्याच्या दिशेने रोखला. व शोभा ठाकूर यांच्या गळ्यावरील चाकू वेळीच हिसकावून घेतला. यावेळी काही जण त्यांची वाहने व हत्यारे घटनास्थळीच सोडून पसार झाले. यावेळी कांबळे यांनी एका हल्लेखोर तरुणास जागीच पकडले. तोपर्यंत घटनास्थळी सदर बाजार पोलिसही दाखल झाले होते. या टोळक्यातील ६ जणांना चार दुचाकी वाहनासह सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक रमेश रुपेकर, उपनिरीक्षक निशा बनसोड यांच्यासह पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात शोभा मोहनसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून राहुल ढाकणे, वैभव ढाकणे यांच्यासह १५ जणांविरुद्ध भादंवि. ३०७, ४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:सादर बाजार व्हिडीओ,या पूर्वीचा देखील व्हिडीओ सेव्ह आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.