जालना - तील निमखेडा रोडवरील पिंपळखुंटा शेतवस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात अज्ञात दरोडेखोरांनी शेजारील घराच्या दरवाजाची कडी लावून महिलांना कुऱ्हाड आणि शस्त्राने वार करून जबर मारहाण केली.
दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावर असलेले सोन्या, चांदीचे दागिने हिसकावत घरातील लोखंडी पेटीत तोडून पेटीतील १५ हजार रोख, सोन्याची अंगठी असे एकूण ४ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या दरोड्यात सखुबाई रामदास खोबरे, रंजना संजय गाडेकर, लता रमेश गाडेकर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांना जालन्यातील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.