ETV Bharat / state

प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्टे खाऊन मोठं झाला आहे, अर्जून खोतकरांची टीका

प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला आहे, खाल्ल्या मिठालाही तो जागला नाही. त्याची जीभ हासडून टाकू, शिवसेना भवन तोडायला आला तर त्याचे हात आणि पाय दोन्हीही शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.

Arjun Khotkar criticizes Prasad Lad
Arjun Khotkar criticizes Prasad Lad
author img

By

Published : Aug 1, 2021, 3:14 PM IST

जालना - प्रसाद लाड हा शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला आहे, खाल्ल्या मिठालाही तो जागला नाही. त्याची जीभ हासडून टाकू, शिवसेना भवन तोडायला आला तर त्याचे हात आणि पाय दोन्हीही शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.

अर्जून खोतकरांची प्रसाद लाड यांच्यावर टीका
प्रसाद लाड हा शिवसेनेच्या बळावर शिवसेनेचं उष्ट खाऊन मोठं झाला, पण खाल्ल्या मिठालाही तो जागला नाही. शिवसेना भवन तोडायला आला तर त्याचे हात आणि पाय दोन्हीही शिल्लक राहणार नाही. शिवाय त्याची जीभ हासडून टाकू, असा इशारा शिवसेनेचे जालना जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रसाद लाड यांना दिला आहे. ईडी, सीबीआयच्या बळावर भाजपची दादागिरी सुरु असून हे जास्त दिवस चालणार नाही असंही खोतकर सांगायला विसरले नाहीत.
छत्रपती संभाजी महाराज भोसले मराठा आंदोलनाची पुढील दिशा ९ ऑगस्ट रोजी ठरवणार आहे. यावर बोलताना संभाजी महाराजांचा आपण आदर करतो असं सांगत त्यांना दिलेला प्रत्येक शब्द राज्य सरकार पाळत असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. शिवाय ज्या मागण्या प्रलंबित आहे त्यावर देखील सरकार तातडीने कार्यवाही करत असल्याचे खोतकर यांनी सांगितलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.