ETV Bharat / state

Jalna Jalgaon Railway : जालना जळगाव रेल्वेला मान्यता, सर्व्हेचे काम लवकरच सुरू होणार - रेल्वे मार्गाचा अंतीम सर्वे

रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) वतीने जळगाव रेल्वे मार्गाचा अंतीम सर्वे (Survey of Jalgaon railway line) मंजूर केला आहे. ज्या रेल्वे मार्गाचे पूर्वी कामे झाली आहेत ते तसेच ठेवून मार्गाच्या कामात हस्तक्षेप न करता लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव 174 किलोमीटर लांबीचा मार्ग केला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये सर्व्हेसाठी मंजुर केले आहेत. अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी दिली आहे.

Raosaheb  Danve
रावसाहेब दानवे
author img

By

Published : Feb 9, 2022, 7:27 PM IST

जालना: जालना जळगाव रेल्वेमुळे (Jalna Jalgaon Railway ) मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना वरुन पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा 70% मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून (Jalna Lok Sabha constituency) जात आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थान च्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. लवकरात लवकर याचे काम पुर्ण होणार आहे. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. अनेक वर्षापासून या भागातील जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याने उशिरा स्वातंत्र्य मिळवलेल्या मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हा रेल्वे मार्ग झाल्याने होणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.