ETV Bharat / state

खाकीतील वात्सल्य : दीड वर्षाच्या मुलीला कामवालीजवळ ठेवून 'निशा' बजावताहेत कर्तव्य - सहाय्यक पोलीस निरीक्षक जालना

निशा या जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर आता कदिमजालना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दावलवाडी येथील निवासस्थानी त्यांची दीड वर्षांची मुलगी 'अद्वैता' ही घरी असते. पती-पत्नी दोघेही अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे कामवाल्या मावशीजवळ मुलीला सोडून कर्तव्यावर हजर राहावे लागत आहे.

jalna API nisha bansod  corona effect  lockdown effect  jalna news  कोरोना परिणाम  जालना कोरोना अपडेट  सहाय्यक पोलीस निरीक्षक जालना  सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड
खाकीतील वात्सल्य : दीड वर्षाच्या मुलीला कामवालीजवळ ठेवून 'निशा' बजावताहेत कर्तव्य
author img

By

Published : Apr 23, 2020, 4:40 PM IST

जालना - लॉकडाऊनमुळे पोलीस प्रशासनात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त तास काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत घर, परिवार, आणि भावना या सर्वांना बाजूला ठेवून कर्तव्य बजावणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे, याचे भान ठेवत हे पोलीस कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये अनेक महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना वात्सल्यावरही पाणी सोडावे लागत आहे. कदिमजालना पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड या आपल्या दीड वर्षाच्या पोरीला कामवालीजवळ देवून कर्तव्य बजावत आहेत.

खाकीतील वात्सल्य : दीड वर्षाच्या मुलीला कामवालीजवळ ठेवून 'निशा' बजावताहेत कर्तव्य

निशा यांनी २०१२मध्ये नागपूर येथून पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम सुरू केले. त्यांचे पती. डॉ. अश्विन डहाके हे जालन्यातील महिको कंपनीमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे काम शेतीशी निगडीत असल्यामुळे त्यांनादेखील दररोज कामावर जावे लागत आहे. त्यांचे निवासस्थान दावलवाडी परिसरात आहे. २०१७मध्ये निशा या जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर आता कदिमजालना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दावलवाडी येथील निवासस्थानी त्यांची दीड वर्षांची मुलगी 'अद्वैता' ही घरी असते. पती-पत्नी दोघेही अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे कामवाल्या मावशीजवळ मुलीला सोडून कर्तव्यावर हजर राहावे लागत आहे.

मुळात अमरावती येथील रहिवासी असलेले हे डहाके-बनसोड कुटुंब अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींना देखील जालन्यात बोलावू शकले नाहीत. पर्यायाने आज या दोघांनाही वात्सल्य, परिवार दीड वर्षाच्या मुलीला बाजूला ठेवून आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. अशावेळी वरिष्ठांनी दिलेले आदेश आणि कनिष्ठांकडून काम करून घेणे यामध्ये समन्वय ठेवताना निश्चितच ओढाताण आणि थोडीफार चिडचिड होते. मात्र, तो एक कामाचा भाग आहे. त्यामुळे दिलेले आदेश पाळावेच लागतात, असेही सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांनी सांगितले. यानंतरही घरी गेल्यावर मुलीला लगेच जवळ न घेता आधी सर्व सॅनिटायझेन त्यानंतर वात्सल्य, अशी सध्या दिनचर्या चालू असल्याचे निशा यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.