ETV Bharat / state

अहो आश्चर्य! जालना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रस्ताव शांततेत मंजूर - jalna

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपमुख्य अधिकारी केशव कानपुडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जालना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रस्ताव शांततेत मंजूर
author img

By

Published : Mar 5, 2019, 11:48 PM IST

जालना - नेहमी गदारोळामुळे चर्चेत राहणारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी शांततेच्या वातावरणात पार पडली. सर्वच विषयांना सभागृहाने सर्वसंमती दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सभेदरम्यान अंबड रोडवर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या दुकानांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली होती.

जालना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रस्ताव शांततेत मंजूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपमुख्य अधिकारी केशव कानपुडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच कुठल्याही विषयावर वादंग न होता खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाला औषधी खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपये देण्याची मंजुरी देण्यात आली. एका दैनिकाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती त्यासाठी झालेला ४ लक्ष रुपयांच्या खर्चालाही यावेळी सभागृहाने मान्यता दिली. तसेच, महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट आणि इस्कॉन यांच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी नगरपालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सकस आहाराला सभाग्रहाने मंजुरी दिली.

या सभेतील महत्वाच्या निर्णयांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या ३० वर्षांपूर्वीच्या जलकुंभाची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे, याबाबत येणाऱ्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. दरम्यान, जालना-अंबड रोडवर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला शेडच्या पत्रांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक दुकानांना नगरपालिकेने परवानगी दिली आहे काय? तसेच, या दुकानांसाठी ४ ते ८ हजार रुपये प्रतिमहिना भाडे आकारले जाते आणि विशेष म्हणजे ही दुकाने नगरपालिकेने तयार केलेल्या सर्विस रोड उखडून तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याप्रकरणात महिन्याभराच्या आत आपण चौकशी करून अहवाल सादर करू, असे आश्वासन उपमुख्याधिकारी केशव कानडे यांनी दिले.

undefined

Intro:जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज मंगळवार दिनांक 5 रोजी शांततेच्या वातावरणात पार पडली. आणि सर्वच विषयांना सभागृहाने संमती दिल्यामुळे सर्वांनाच एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. दरम्यान जालना अंबर रोडवर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या तीन शेळीच्या दुकानांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.

Body:डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये जालन्याच्या नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, यांच्यासह उपमुख्य अधिकारी केशव कानपुडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आज पहिल्यांदाच कुठल्याही विषयावर वादग्रस्त चर्चा न होता खेळीमेळीच्या वातावरणात किरकोळ चर्चा करण्यात येऊन सभेसमोर ठेवलेल्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली .आरोग्य विभागाला औषधी खरेदी करण्यासाठी तीन लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली, एका दैनिकाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती त्यासाठी झालेला चार लक्ष रुपयांच्या खर्चालाही यावेळी सभागृहाने मान्यता दिली, महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट आणि इस्कॉन यांच्यावतीने अनामृत फाउंडेशन या संस्थेमार्फत शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी नगरपालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती .शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सकस आहाराला सभाग्रहाने मंजुरी दिली. तसेच आजच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये सर्वे नंबर 488 मध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या तीस वर्षांपूर्वीच्या जलकुंभाची दुरुस्ती करून रंगरंगोटी करणे बाबत येणाऱ्या खर्चालाही मंजुरी दिली. याच सोबत अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रातून टँकर भरून देण्यासाठी जालना शहराचा पाणीपुरवठा झाल्यानंतर उर्वरित पाणी देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आली.
आज झालेल्या या सर्वसाधारण सभेमध्ये कुठल्याही विषयाला ताणून न धरता किरकोळ चर्चा करून सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली .
दरम्यान सर्वे नंबर 487 जालना अंबड रोड वर जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या शेडच्या पत्रांमध्ये उभारण्यात आलेल्या अनेक दुकानांत संदर्भात नगरपालिकेने परवानगी दिली आहे काय ?तसेच या दुकानांसाठी चार ते आठ हजार रुपये महिना प्रति भाडे आकारले जाते आणि विशेष म्हणजे ही दुकाने नगरपालिकेने तयार केलेल्या सर्विस रोड उखडून तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. दरम्यान यासंदर्भात तीस दिवसांमध्ये आपण चौकशी करून अहवाल सादर करू असे आश्वासन उपमुख्याधिकारी केशव कानडे यांनी दिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.