ETV Bharat / state

वीजबिल माफीसाठी जालना येथे वंचित बहुजन आघाडीचा 'अर्धनग्न मोर्चा'

आज वाढीव वीजबिलाविरोधात वंचित आघाडीच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

agitation-by-vanchit-bahujan-aaghadi-against-electric-bill-in-jalna
वीजबिल माफीसाठी जालना येथे वंचित आघाडीचा 'अर्धनग्न मोर्चा'
author img

By

Published : Nov 26, 2020, 5:49 PM IST

Updated : Nov 26, 2020, 8:23 PM IST

जालना - राज्य सरकारने वीज ग्राहकांवर अन्याय केला आहे. टाळेबंदीच्या कार्यकाळात वीजबिल माफ करण्याचे सोडून वीज दरवाढ केली आहे. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला.

राजेंद्र कोरडे यांची प्रतिक्रिया

अर्धनग्न मोर्चा-

आज संविधान दिनाचे औचित्य साधून शहरातील मस्तगड परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला. वीज वितरण कंपनीचा कार्यालयापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न परिस्थितीमध्ये हा मोर्चा काढून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मार्च महिन्यापासून टाळेबंदी होती. त्यामुळे व्यापार बंद होते. दरम्यान जनतेचे रोजगार बुडाले जवळपास सर्वजण आर्थिक बाबतीत अडचणीत आले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वीजबिलात सूट द्यायला हवी. मात्र, असे न होता वीजदरवाढ केल्याचे दिसून येत आहे. शासनाने जनतेला मदत करीत पंचवीस टक्के राज्य सरकार, 25% केंद्रसरकार आणि पन्नास टक्के वीज वितरण कंपनी, असा सुमारे शंभर टक्के वीजबिल माफीचा उपक्रम शासनाने हाती घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्यांचा योग्य विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

हेही वाचा- 'हा' माजी भारतीय खेळाडू आहे २२ मुलींचा पिता

Last Updated : Nov 26, 2020, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.