जालना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटी न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा विधानसभेत करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने भोकरदन शहरात बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, तसेच सिल्लोड रोडवर महात्मा फुले चौकात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके उडवून या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री ठाकरे व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा - राज्यघटनेला 70 वर्ष पूर्ण : जालन्यात सामाजिक न्याय विभागातर्फे विविध स्पर्धांना सुरूवात
कर्जमाफीच्या घोषणेनंतर आज संध्याकाळी शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी शिवसेना नेते महेश पुरोहित , सुरेश तळेकर यांचा त्यांच्या सिल्लोड रोडवरील कार्यालयात हार, शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला, तसेच ठाकरे सरकार व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले.
हेही वाचा - रेल्वे रुळ दुरुस्ती; आठवड्यातून तीन दिवस गाड्या धावणार उशिरा
यावेळी महेश पुरोहित, इरफान सिद्दीकी, सुरेश तळेकर, संतोष अन्नदाते, विठ्ठल पवार, बबन शिंदे, नाना सहाणे, नसीम पठाण, महेश औटी, परमेश्वर हातोळे, लक्षण उपेवाड, अज्जू भाई, योगेश वरपे, सांडू महाराज जोशी, पंडित वाघमारे, बापू पाटील, शेख शफीक, अब्दुल जब्बार, ईश्वर इंगळे, गणेश इंगळे, अजीम शेख, भगवान राऊत, अमोल काळे, योगेश पुंड, कृष्णा तराळ, रवी सुरासे, विनोद देशमुख, दत्ता इंगळे, एकनाथ ठाले, स्वप्नील शर्मा, विकास पुंड आदी उपस्थित होते.